एमआयडीसी भूखंडांचे वाटप निविदेद्वारे - देसाई
By Admin | Published: September 20, 2016 05:04 AM2016-09-20T05:04:48+5:302016-09-20T05:04:48+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ज्या वसाहतींतील ८० टक्के भूखंड वितरित झालेले आहेत
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ज्या वसाहतींतील ८० टक्के भूखंड वितरित झालेले आहेत तेथे उर्वरित भूखंड आता निविदा पद्धतीने वितरित करण्यात येणार आहेत. त्यापेक्षा कमी भूखंड वितरित झालेले असल्यास आॅनलाइन वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महामंडळाच्या संचालक मंडळ बैठकीत दिली
भूखंड वाटपाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग संजीवनी योजनेस आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्याची तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सह विकासक नेमण्यास मुदतवाढ देण्याची घोषणाही देसाई यांनी केली. महामंडळाकडील भूखंड घेऊनही त्यावर उद्योगांची उभारणी न करणाऱ्या उद्योगांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे. त्यासाठीच उद्योग संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
या संजीवनी योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. आता या योजनेचा फायदा वाणिज्य, निवासी, प्राधान्य तसेच उद्योग विस्तारांतर्गतच्या भूखंडांनादेखील देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)