मध्यमवर्गीय जाती निर्मूलनापासून दूर

By admin | Published: May 16, 2016 01:47 AM2016-05-16T01:47:11+5:302016-05-16T01:47:11+5:30

समाजातील सर्व घटकांनी जाती निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असताना तसे दिसून येत नाही

Middle-class castes are far from eradicating | मध्यमवर्गीय जाती निर्मूलनापासून दूर

मध्यमवर्गीय जाती निर्मूलनापासून दूर

Next

देहूरोड : समाजातील सर्व घटकांनी जाती निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असताना तसे दिसून येत नाही. उलट देशातील बहुसंख्य लोक मध्यमवर्गीय बनू लागले आहेत. आजचा मध्यमवर्गीय हा अत्यंत दुबळा, विचारहीन आणि संवेदनाहीन असून, जाती निर्मूलनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दिष्टांपासून खूप दूर चालला आहे, असे परखड मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी येथे व्यक्त केले.
ज्येष्ठ आंबेडकरी अनुयायी व कामगार नेते काशिनाथ सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘एकच ध्यास धम्मभूमी देहूरोडचा विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन हभप रामदासमहाराज यांचे हस्ते झाले. त्या वेळी वैद्य बोलत होते. भन्ते राजरतन , पशुराम वाडेकर, दादासाहेब सोनवणे, मिलिंद भालेराव, कवी प्रा. बाबासाहेब जाधव, आकाश सोनवणे, आर. के. लोंढे, सी. डी. धस आदी उपस्थित होते.
वैद्य म्हणाले, डॉ आंबेडकर यांना हा देश जातीविरहित देश बनवायचा होता. त्यांनी जाती निर्मूलनासाठी लढणारी एक फळी तयार केली होती. वाघासारखी डरकाळी फोडून जाती व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम या फळीने करावे, असे त्यांचे स्वप्न होते. पण, दुर्दैवाने ज्यांनी हे करायचे होते, तेच आता जातीयवाद्यांच्या पुढ्यात बसले आहेत. घटनेच्या प्रास्ताविकेतील काही शब्द बदलले जात आहेत. याकडे दुर्लक्ष केले, तर एक दिवस संपूर्ण घटनाच बदली होईल. घटनेची रक्षण करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी आहे. प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या शब्दांप्रमाणे जातीविरहित हा शब्द घालण्याची गरज आहे.
ह.भ.प. रामदासमहाराज म्हणाले, माणूस हा मानवतावाद सोडून अंधश्रद्धेमागे धावत आहे. (वार्ताहर)

Web Title: Middle-class castes are far from eradicating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.