वीज पुरवठा खंडित करून घातपात घडवायचा होता?; ऊर्जामंत्र्यांकडून संशय व्यक्त

By कुणाल गवाणकर | Published: October 14, 2020 07:45 AM2020-10-14T07:45:22+5:302020-10-14T07:47:42+5:30

Power Cut in Mumbai: सोमवारी मुंबई आणि परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता

might be a conspiracy behind power cut in mumbai power minister nitin raut express suspect | वीज पुरवठा खंडित करून घातपात घडवायचा होता?; ऊर्जामंत्र्यांकडून संशय व्यक्त

वीज पुरवठा खंडित करून घातपात घडवायचा होता?; ऊर्जामंत्र्यांकडून संशय व्यक्त

googlenewsNext

मुंबई: सोमवारी मुंबई आणि शेजारच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. याचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला. लोकल सेवा ठप्प झाली. सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल रात्री उशिरा एक ट्विट करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. 

'सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,' असं ट्विट नितीन राऊत यांनी रात्री बाराच्या सुमारास केलं. त्यामुळे चर्चेला उधाण आलं. मुंबई आणि परिसरात घातपात घडवण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

वीजपुरवठा खंडित; मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली ठप्प
महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा केंद्रातील सर्किट - २ चा वीजपुरवठा बंद पडल्यानं सोमवारी सकाळी १० वाजता मुंबईसह ठाणे, कल्याण व रायगड जिल्ह्यातील काही भागांचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यास सोमवारी रात्रीचे साडेबारा वाजले. भांडुप आणि ठाणे परिसरात सोमवारी रात्री साडेबारा ते एक वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा, पडघा, खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद झाल्यानं मुंबई व मुंबई उपनगरचा २२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला. कळवा-खारघर येथील जंपर ब्रेकडाऊन झाला. सोमवारी दुपारी अडीच वाजता तो सुरू करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. रेल्वेचा वीजपुरवठा वेगाने सुरळीत केला.

महापारेषणने उपकेंद्रांतील बिघाड दुरुस्त केल्यानंतर, मुंबई व मुंबई उपनगरांसह ठाणे व रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा महावितरणकडून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. भांडुप परिमंडळातील सुमारे नऊ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपर्यंत सुरू करण्यात आला. उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठाही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. महापारेषणच्या म्हणण्यानुसार, रेल्वे व रुग्णालयांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरू करण्यात आला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास बंद पडलेली मुंबई वीज प्रणालीही सुरू करण्यात आली.

नेमकं काय झालं होतं?
महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट- २ वर होता. मात्र, सर्किट - २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील काही भागांत वीजपुरवठा सोमवारी दिवसभर खंडित झाला.
 

Read in English

Web Title: might be a conspiracy behind power cut in mumbai power minister nitin raut express suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.