मिहान सर्वात मोठा थकबाकीदार!

By admin | Published: August 24, 2014 01:10 AM2014-08-24T01:10:23+5:302014-08-24T01:10:23+5:30

मनपाचा संपत्ती कर न भरणाऱ्यांच्या यादीत मिहान इंडिया लिमिटेडचे नाव आघाडीवर आहे. या कंपनीकडून मनपाला तब्बल १० कोटी ७५ लाख, ७६ हजार, ८८७ रुपये वसूल करायचे आहे.

Mihan is the biggest daring! | मिहान सर्वात मोठा थकबाकीदार!

मिहान सर्वात मोठा थकबाकीदार!

Next

१०.७५ कोटींचा संपत्ती कर : मोठ्या थकबाकीदारांवर १०० कोटी थकित
नागपूर : नागपूर : मनपाचा संपत्ती कर न भरणाऱ्यांच्या यादीत मिहान इंडिया लिमिटेडचे नाव आघाडीवर आहे. या कंपनीकडून मनपाला तब्बल १० कोटी ७५ लाख, ७६ हजार, ८८७ रुपये वसूल करायचे आहे. पण मनपाच्या ढिम्म कारवाईने वसुली शून्य असून मनपाचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
सामान्य व्यक्तीने कराचा भरणा केला नाही तर मनपाचे कर्मचारी त्याच्या घरी वसुलीसाठी वारंवार फेऱ्या मारतात. अनेकदा नोटीस देऊन कारवाईच्या नावाखाली घर लिलाव करण्याची धमकीसुद्धा देतात. पण शहरात संपत्ती कर न भरणारे जवळपास १५० पेक्षा जास्त थकबाकीदार असून त्यांच्याकडून १०० कोटींपेक्षा जास्त वसुली प्रलंबित असल्याची बाब माहिती अधिकार कायद्यातून उघड झाली आहे. आयटीआय कार्यकर्ता संजय अग्रवाल यांना ही माहिती कर अधीक्षक मदन सुभेदार यांनी दिली आहे.
दरवर्षी भक्कम डिमांड नोट जारी करण्याची घोषणा मनपाच्या संपत्ती कर विभागातर्फे केली जाते. पण वसुली प्रकरणात मनपा नेहमीच मागे असते. राजकीय दबावामुळे संपत्ती कराची वसुली होत नाही, ही नेहमीचीच बाब आहे.
विभागाची कार्यप्रणाली यासाठी दोषी आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार बँक, व्यावसायिक प्रतिष्ठान, बिल्डर्स व डेव्हलपर्सवर सर्वाधिक संपत्ती कर थकीत आहे. शैक्षणिक संस्थाही मागे नाही. शहरातील प्रतिष्ठित इंजिनीअरिंग व कॉमर्स कॉलेजवर संपत्ती कराचे लाखो रुपये थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार, अधिकांश संपत्तीधारक कर भरण्यासाठी तयार आहेत. पण त्यांना डिमांड नोट मिळालेले नाही. तसे पाहता विभाग संपत्तीधारकांच्या नावे मनपा नियमित डिमांड नोट जारी करते. मग हे डिमांड नोट जातात तरी कुठे, असा सवाल उपस्थित होतो. दरमहा दोन टक्के दंडाची तरतूद असतानाही थकबाकीदारांची संख्या वाढतच आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mihan is the biggest daring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.