पुरुषोत्तम करंडकावर नगरचा झेंडा, न्यू आर्टसची माईक सर्वप्रथम 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 11:53 PM2017-09-10T23:53:09+5:302017-09-11T00:24:20+5:30

आवाज कोणाचा अहमदनगरचा अशा जल्लोषात यावर्षी न्यू आर्टस्,सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय अहमदनगर यांच्या माईक या एकांकिकेने पुरुषोत्तमचा मान मिळवला आहे.

Mike Ekankey won the Purushottam Trophy |  पुरुषोत्तम करंडकावर नगरचा झेंडा, न्यू आर्टसची माईक सर्वप्रथम 

 पुरुषोत्तम करंडकावर नगरचा झेंडा, न्यू आर्टसची माईक सर्वप्रथम 

Next

पुणे, दि. 10 - महाविद्यालयीन जगताचा मानाचा समजला जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडकावर यंदा अहमदनगरच्या न्यू आर्टस, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या माईक या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ द्वितीय क्रमांकाचा हरिविनायक करंडक पी.इ. एस मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ए एस एल प्लिज या एकांकिकेने तर तिसºया क्रमाकांचा संजीव करंडक बी.एम.सी.सी महाविद्यालयाच्या सॉरी परांजपे या एकांकिकेने पटकावला. यावर्षी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा जयराम हर्डीकर करंडकाचा मान कोणीच मिळवू शकले नाही. सर्वोत्कृष्ट आयोजित संघ म्हणून वि.आय.आय.टी महाविद्यालयाच्या कोंडी या एकांकिकेतूला मिळाली आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल आज जाहीर झाला. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून ५१ महाविद्यालयीन संघांपैकी अंतिम फेरीसाठी ९ संघांची निवड करण्यात आली होती. ९ आणि १० सप्टेंबर या दोन दिवशी या ९ महाविद्यालयांनी उत्तम प्रकारे एकांकिकांचे सादरीकरण केले. यातून ४ महाविद्यालयांची पुरुषोत्तमसहित इतर २ करंडकासाठी निवड करण्यात आली.
सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्याचे पारितोषिक पी़ ई एस माडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आदित्य कुलकर्णी ( ए़एस एल प्लिज) याने तर सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयाचे पोरितोषिक स़ प़ महाविद्यालयाचा नाथप्रसाद पुरंदरे (आदित्य मुजुमदार, भूमिका) याने मिळविले. अभिनय नैपुण्याचे पोरितोषिक बीएमसीसी च्या गंधर्व गुळवेकर (प्रण्योज, सॉरी परांजपे) आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची समृद्धी देशपांडे (मॉरगॉट, आस्टर द डायरी) यांनी पटकाविले.
सवोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक ऋषी मनोहर याला सॉरी परांजपे (बृ. वाणिज्य महाविद्यालय) या एकांकिसाठी मिळाला. उत्तेजनार्थ दिग्दर्शकाचे पारितोषिक कृष्णा वाळके माईक (न्यु आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, अहमदनगर) आणि सुरज गडगिळे यांना आफ्टर द डायरी (आबासाहेब गरवारे महाविद्यालय) यांना देण्यात आले.
अभिनयाचे उत्तेजनार्थ पोरितोषिके खालील प्रमाणे ( भूमिका, एकांकिा, महाविद्यालय) : प्राची रोकडे, (माया, एएसएल प्लिज, पी़ ई़ एस़ मॉडर्न अभि.), विराज अवचित्ते (भय्या, माईक, न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स, नगर), कृष्णा वाळके (बज्या, माईक, न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स, नगर), पार्थ वाईकर (विश्वनाथ साने, साने आणि कंपनी, काशीबाई नवले अभि़), शुभम कुलकर्णी (गणेश, मुकुंद कोणी हा पाहिला, गरवारे वाणिज्य), हरिष बारस्कर (यशवंत, ड्रायव्हर, पेमराज सारडा, नगर), ओजस मराठे (सावरकर, भेट, फर्ग्युसन महा़), चिन्मय पटवर्धन (चैतन्यप्रभू, भूमिका, स़ प़ महा़), वैभवी चव्हाण (अ‍ॅन, आफ्टर द डायरी, आबासाहेब गरवारे), ऋचा भाटवडेकर (सुलोचना साने, साने आणि कंपनी, काशीबाई नवले अभि़),
उत्तेजनार्थ विद्यार्थीनी दिग्दर्शिका हे पारितोषिक जान्हवी चावरे (इन बिटविन, सिंहगड अभि़) यांना तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकाचे पोरितोषिक रत्नदीप शिंदे व सुरज गडगिळे (आफ्टर द डायरी, आबासाहेब गरवारे) यांना देण्यात आले.
उत्तेजनार्थ विद्यार्थीनी लेखिका पूर्वा राजज्ञा, भावना झाडे (साकव, कमिन्स महिला अभि़) यांनी देण्यात आले तर सर्वोत्कृष्ट आयोजित संघ म्हणून भालचंद्र मानचिन्ह विश्वकर्मा इन्स्टिट्युट आॅफ इंन्फरमेशन टेक्नालॉजी या महाविद्यालयाच्या कोंडी या एकांकिकेला देण्यात आले आहे़ अंतिम फेरीचे परिक्षक म्हणून समर नखाते, मिलिदं फाटक आणि अमिता खोपकर यांनी काम पाहिले.

Web Title: Mike Ekankey won the Purushottam Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.