मिखाईलने दिले पुरावे?

By admin | Published: August 28, 2015 02:31 AM2015-08-28T02:31:21+5:302015-08-28T02:31:21+5:30

शीनाची हत्या इंद्राणीनेच केली, ती का केली हेही मला माहीत आहे, वेळ आल्यावर मी सर्व माहिती उघड करेन, असा दावा करणाऱ्या मिखाईल दासचा जबाब गुरुवारी मुंबई पोलिसांच्यविशेष

Mikhail gave evidence? | मिखाईलने दिले पुरावे?

मिखाईलने दिले पुरावे?

Next

- जयेश शिरसाट,  मुंबई/गुवाहाटी
शीनाची हत्या इंद्राणीनेच केली, ती का केली हेही मला माहीत आहे, वेळ आल्यावर मी सर्व माहिती उघड करेन, असा दावा करणाऱ्या मिखाईल दासचा जबाब गुरुवारी मुंबई पोलिसांच्यविशेष पथकाने गुवाहाटीतील दिसपूर पोलीस ठाण्यात नोंदवला. गुरूवारी पोलीस निरिक्षक केदार पवार व पथकाने थेट गुवाहाटी गाठून मिखाईलचा जबाब नोंदवला. दिसपूर
पोलीस ठाण्यात येताना मिखाईलने सोबत एक लिफाफा आणला होता. त्यात त्याने काही छायाचित्रे व माहिती आणली होती. सूत्रांनुसार मिखाईलने इंद्राणीने आपल्या मुलांवर केलेल्या अत्याचारांचे, वाईट वागणुकीचे आणि शीनाच्या हत्येशी संबंधात महत्वाची माहिती मुंबई पोलिसांना पुरवली आहे.
मिखाईल हा शीनाचा सख्खा भाऊ असून इंद्राणी व सिद्धार्थ दास यांचा मुलगा आहे. शीना व मिखाईल ही इंद्राणी आपली भावंडे असल्याचे इंद्राणीने आजवर सर्वांना भासवले होते. लहानपणापासून इंद्राणीच्या आई-वडिलांनी या दोघांना सांभाळले. आता आजी-आजोबा आजारी असून मी मुंबईला जबाब नोंदविण्यासाठी येणे शक्य नाही, असे मिखाईलने सांगितले होते.
दरम्यान, मिखाईल बोरा याला आता जीवाची भीती भेडसावू लागली आहे. माझ्या जीवाला धोका असून मी पुढील लक्ष्य ठरू शकतो, अशी भीती त्याने वर्तवली आहे. मिखाईल वोरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले होते. पण त्याने एकट्याने येण्यास असमर्थता दर्शविली आहे. जीवाला धोका असल्याने येऊ शकत नसल्याचे त्याने कळविले आहे. त्याची लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्याने असमर्थता दर्श विल्यामुळेच मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्याने गुवाहाटीला जाऊन मिखाईची तासभर चौकशी केली.

मलाही बोलवत होती कोलकात्याला
इंद्राणीने शीनापाठोपाठ मिखाईलच्याही हत्येचा कट आखला होता, असाही अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्याबाबत मिखाईलने मुंबई पोलिसांना सांगितले की, दोनेक वर्षांपुर्वी इंद्राणीने मलाही कोलकात्यात येण्यास बजावले होते. तेथे चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देते, असे आमीषही दाखवले होते. मात्र तिचा मनात सुरू असलेल्या कपटाचा अंदाज मला आधीपासूनच होता. त्यामुळे मी तिला नकार दिला. मी जर कोलकात्याला गेलो असतो तर तिने माझीही शीनाप्रमाणेच हत्या केली असती.

मी पुढचे लक्ष्य असेन
गुरुवारी आजी-आजोबांच्या घराबाहेर मिखाईल पत्रकारांशी बोलताना माझ्या जीवाला धोका असल्याचे मिखाईल म्हणाला. मी पुढील लक्ष्य ठरेल, अशी भीती मला वाटू लागली आहे.
पोलिसांनी मला चौकशीसाठी मुंबईला जावे लागल्यास माझ्या मित्रांना मी
माझ्या सोबत नेऊ इच्छितो. कारण मुखर्जी दाम्पत्य उच्चभू्र वर्गातील आहे आणि माझ्यासोबत काहीही होऊ शकते.
माझ्या बहिणीच्या हत्येबाबतचे संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी मी पोलिसांची यथाशक्ती मदत करेल, असे मिखाईल म्हणाला. या हत्याकांडामागे संपत्तीचा वाद हेही कारण असू शकते, असे
संकेतही त्याने दिले. शीना माझी मोठी बहीण होती आणि मला न्याय हवा, असेही तो म्हणाला.

संजीव खन्नाला पाच दिवसांचा ट्रान्झिट रिमांड
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा पूर्वाश्रमीचा पती आणि या प्रकरणातील एक आरोपी संजीव खन्ना याची जामीन याचिका येथील एका न्यायालयाने गुरुवारी फेटाळली; शिवाय त्याला पाच दिवसांसाठी मुंबई पोलिसांच्या कोठडीत दिले.
इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याने कोलकाता येथील न्यायालयात हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचा आरोप फेटाळून लावला. त्याने न्यायालयाला सांगितले की मी इंद्राणीच्या गाडीत होतो. इंद्राणीने शीनाची गळा आवळून हत्या केली. मात्र मी हत्येत सहभाग घेतला नाही.

Web Title: Mikhail gave evidence?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.