नाट्यसंमेलनावर ‘मिक्ता’चे सावट!

By Admin | Published: February 11, 2016 03:59 AM2016-02-11T03:59:00+5:302016-02-11T03:59:00+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने ठाण्यात होणाऱ्या ९६व्या नाट्यसंमेलनाकडे पाठ फिरवून काही कलावंतांना आॅस्टे्रलियात होणाऱ्या ‘मिक्ता’ सोहळ्याचे वेध लागले आहेत.

Mikta's dancing on the Natya Sammelan! | नाट्यसंमेलनावर ‘मिक्ता’चे सावट!

नाट्यसंमेलनावर ‘मिक्ता’चे सावट!

googlenewsNext

- महेंद्र सुके, ठाणे
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने ठाण्यात होणाऱ्या ९६व्या नाट्यसंमेलनाकडे पाठ फिरवून काही कलावंतांना आॅस्टे्रलियात होणाऱ्या ‘मिक्ता’ सोहळ्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे नाट्यसंमेलनातील ग्लॅमर हरवण्याची चिंता आयोजकांना लागली आहे.
अखिल भारतीय नाट्यसंमेलन १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. तर, २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान मिक्ता (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अ‍ॅण्ड थिएटर अवॉर्ड्स) सोहळा आॅस्ट्रेलियात होणार आहे. मिक्ताच्या आयोजकांपैकी काही कलावंतांची टीम या सोहळ्याच्या तयारीसाठी आधीच आॅस्ट्रेलियाला जाणार आहे. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने इतर कलावंत रवाना होणार आहेत.
नाट्य-सिनेकलावंतांसाठी हे दोन्ही सोहळे महत्त्वाचे असतात. त्यामुळे या दोन्हीच्या तारखा ओव्हरलॅप होऊ नयेत, याविषयी समन्वयाची गरज होती. मात्र, ते झाले नसल्याचेच आता उघड झाले आहे. बुधवारी ठाण्यात नाट्यसंमेलनातील कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आयोजकांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी आयोजन समितीतील एका सदस्याने सांगितले की, ‘मिक्ता’मुळे या संमेलनाला उपस्थित राहू शकत नसल्याचे काही कलावंतांनी कळविले आहे.

विशेषकरून आम्हाला काही ‘आर्टिस्ट’ पाहिजे होते, ते मिळू शकले नाहीत. ज्येष्ठ सिनेनाट्य दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी यांचे एका परिसंवादात असणे गरजेचे होते; पण ते ‘मिक्ता’मुळे त्या परिसंवादात नसतील, अशी खंत व्यक्त करण्यात आली.

परदेशात सोहळा असल्याने आयोजकांपैकी काही कलावंतांना तिथली व्यवस्था करण्यासाठी आधी जावे लागणार आहे. दोनशे-अडीचशे कलावंतांची परदेशात नीट व्यवस्था करण्याची जबाबदारी आयोजकांवर असते, ते समजून घ्या. संमेलनावर कुरघोडी करण्याचा आमचा उद्देश नाही. फार आधी हा सोहळा निश्चित झाला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशींपासून आम्ही सारेच एकत्र काम करणारे आहोत.
- चंद्रकांत कुलकर्णी, सिने-नाट्य दिग्दर्शक

Web Title: Mikta's dancing on the Natya Sammelan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.