नंदुरबार, नवापुरात भूकंपाचे सौम्य धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:35 AM2018-04-22T01:35:30+5:302018-04-22T01:35:30+5:30
नंदुरबार व परिसरात ४ वाजून ५२ ते ५६ मिनिटांदरम्यान हे धक्के जाणवले.
नंदुरबार : गुजरातच्या सीमावर्ती भागातील अनेक गावांना शनिवारी सायंकाळी भूकंपाचे हलके धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र भरूच येथे होते. तेथे ४.६ रिश्टर स्केलची नोंद करण्यात आली. भूकंपामुळे कुठलेही नुकसान झालेले नाही.
नंदुरबार व परिसरात ४ वाजून ५२ ते ५६ मिनिटांदरम्यान हे धक्के जाणवले. काळंबा (ता. नवापूर) येथील अविनाश बिºहाडे यांच्या घराच्या भिंतीला भूकंपामुळे तडा गेला.
भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील भरूच येथे असल्याचे गांधीनगर येथील भूकंप नोंद केंद्रातर्फे सांगण्यात आले. सरदार सरोवर प्रकल्पाअंतर्गत एकूण नऊ ठिकाणी भूकंप नोंदणी केंद्र आहेत. नंदुरबार, नवापूरसह सर्व तहसीलदारांना याबाबत माहिती घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. एम. कलशेट्टी यांनी सांगितले.