‘म्हाडा’च्या उपाध्यक्षपदी मिलिंद म्हैसकर

By Admin | Published: June 7, 2017 05:30 AM2017-06-07T05:30:58+5:302017-06-07T05:30:58+5:30

म्हाडाच्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती केली जात आहे

Milind Mhaiskar, as the Vice President of MHADA | ‘म्हाडा’च्या उपाध्यक्षपदी मिलिंद म्हैसकर

‘म्हाडा’च्या उपाध्यक्षपदी मिलिंद म्हैसकर

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी पल्लवी दराडे यांची नियुक्ती करण्यात येत असून म्हाडाच्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती केली जात आहे. ही माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबतचे आदेश लवकरच काढले जाणार आहेत.
म्हाडाचे उपाध्यक्षपद गेल्या एक महिन्यापासून रिक्त आहे. त्याचा पदभार संजय लाखे यांच्याकडे असून काही महिने म्हैसकर हे म्हाडा आणि मुख्यमंत्री कार्यालय असा पदभार सांभाळणार आहेत. म्हैसकर हे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले आहेत. शिवाय त्यांनी याआधी ज्या विभागात काम केले त्या त्या ठिकाणी स्वत:ची अशी छाप टाकली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव राहिलेले प्रवीण दराडे यांच्या पत्नी व मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त उपायुक्त पल्लवी दराडे यांना एफडीएमध्ये आयुक्त म्हणून पाठवले जात आहे. मुंबई महापालिकेत आयुक्त अजय मेहता यांनी त्यांचा पदभार दोन वेळा बदलला होता.

Web Title: Milind Mhaiskar, as the Vice President of MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.