दूधभेसळ शोधणारे यंत्र लवकरच घरात

By admin | Published: September 18, 2016 01:16 AM2016-09-18T01:16:58+5:302016-09-18T01:16:58+5:30

दुग्धविकासात राज्याचा सातवा क्रमांक आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य काही महिन्यांतच बनल्याशिवाय राहणार नाही.

Milk explorer will soon be in the house | दूधभेसळ शोधणारे यंत्र लवकरच घरात

दूधभेसळ शोधणारे यंत्र लवकरच घरात

Next


ठाणे : दुग्धविकासात राज्याचा सातवा क्रमांक आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य काही महिन्यांतच बनल्याशिवाय राहणार नाही. दुधातील भेसळ ही मोठी समस्या आहे.
यापासून जीविताला गंभीर धोका पोहोचत आहे, हे ओळखून दुग्धविकास विभागाने कठोर पावले उचलली आहेत.
सर्वसामान्य ग्राहकही आपल्या घरी ठेवू शकेल, असे भेसळ ओळखू शकणारे छोटेसे यंत्र आम्ही आणत आहे. त्यामुळे या भेसळीवर नियंत्रण येऊन गुन्हेगारांना समोर आणता येणार असल्याचे सूतोवाच पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी ठाण्यात
केले.
येथील गावदेवी मैदान येथे स्वाभिमानी शेतकरी दूध खरेदी केंद्राचे उद्घाटन शनिवारी जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभाग आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दूध थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.
यामुळे शेतकऱ्यांना तर फायदा होईलच, शिवाय ग्राहकांनादेखील वाजवी दरात चांगले दूध मिळेल. थेट शेतकरी ते ग्राहक या योजनेंतर्गत ग्राहकांना हे दूध दिले जात आहे. बाहेरील कुठल्याही ब्रॅण्डपेक्षा राज्यातील दुधाची लोकप्रियता आम्ही वाढवणार आहोत. इतर दुधाच्या तुलनेत पाच रुपये कमी घेऊन स्वाभिमानी दूध ग्राहकांना दिले
जात असल्याचेही जानकर यांनी सांगितले.
सुरू केलेल्या आठवडा बाजारांच्या माध्यमातून चांगला भाजीपाला जसा मिळतोय, तशीच ज्वारी, बाजरी यासारखी धान्येदेखील थेट शेतातून या बाजारात यावीत. चांगल्या प्रतीचे चिकन-मटण हवाबंद पाकिटांमधून विक्री करून या व्यवसायातील रोजगारदेखील
कसा वाढवता येईल, यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे जानकर म्हणाले.
याप्रसंगी खासदार राजू शेट्टी, आमदार विनायक मेटे यांची भाषणे झाली. प्रारंभी आमदार संजय केळकर यांनी शेतकरी आठवडा बाजार ठाण्यासारख्या ठिकाणी सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली तसेच आता भाजीपाल्याप्रमाणे
चांगले दूध वाजवी दरात उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Milk explorer will soon be in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.