दूध उत्पादकांना मिळणार लिटरमागे २८ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 08:34 PM2019-08-31T20:34:30+5:302019-08-31T20:43:19+5:30

दूध पावडरचे दर घसरल्यास दुधाचे दर देखील १७ रुपये लिटरपर्यंत खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही...

Milk producers get Rs 28 per liter | दूध उत्पादकांना मिळणार लिटरमागे २८ रुपये

दूध उत्पादकांना मिळणार लिटरमागे २८ रुपये

Next
ठळक मुद्दे१ सप्टेंबरपासून होणार बदल : ग्राहकांना कोणतीही झळ बसणार नाहीदूध उत्पादक व ग्राहकांचा विचार करुन दूध खरेदीदर एकच ठेवण्याचा निर्णय

पुणे : दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी येत्या १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर २८ रुपये देण्याचा निर्णय विविध दूध उत्पादक संघांनी घेतला आहे. सर्वांचा खरेदी दर एकच असावा यावरही एकमत झाले असल्याने दूध खरेदीबाबत सुरु असलेली अनिष्ट स्पर्धा त्यामुळे संपुष्टात येणार असल्याचे दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या वतीने देण्यात आली. खरेदीदरात वाढ झाली तरी, ग्राहकांना त्याची कोणतीही झळ बसणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले.
सहकारी व खासगी दूध व्यवसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यवसायिक कल्याणारी संघाची सभा शनिवारी कात्रज येथे झाली. सोनाई, पराग, चितळे, प्रभात, स्वराज, एस. आर. थोरात, कृष्णाई, ऊर्जा, नेचर, तसेच बारामती, पुणे, गोकूळ, महानंद, सोलापूर या सहकारी दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. ह्यसध्या दुधाचा तुटवडा जाणवत असून, दूध पावडरला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे दूध खरेदीदर वाढविण्यासाठी उत्पादक संघांमधे स्पर्धा सुरु झाली होती. अशा वाढीचा दूध उत्पादकांना प्रत्येकी वेळी फायदा होत नाही. दूध पावडरचे दर घसरल्यास दुधाचे दर देखील १७ रुपये लिटरपर्यंत खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बदलणाºया दूधदराचा परिणाम शेतकरी, दूध विक्रेता आणि डेअरी व्यावसायिक अशा सर्वांवरच होतो. 
दूध उत्पादक व ग्राहकांचा विचार करुन दूध खरेदीदर एकच ठेवण्याचा निर्णय संघाच्या बैठकीत घेण्यात आला. या पुर्वी खासगी आणि सहकारी दूध संघ २५ ते २७ रुपया दरम्यान खरेदीदर देत होते. आता, येत्या १ सप्टेंबरपासून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधासाठी २८ रुपये प्रतिलिटर दर देण्यात येईल. त्यामुळे खरेदीदरात एकवाक्यात येणार आहे. तसेच, यापुढे दूध खरेदीचे दर पत्रक देखील संघटनाच तयार करेल. दरमहिन्याला आढावा घेतला जाईल. त्या नुसार खरेदी दरात वाढ अथवा घट करण्याचा निर्णयही घेतला असल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ व उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली. 
एमआरपी ते डिलरदर यामधे मोठी तफावत आहे. दूधउत्पादक संघांमधील स्पधेर्तून विक्रेत्याला अधिक दर देण्याची चढाओढ लागलेली असते. काही उत्पादक संघ तर लिटरमागे पाच रुपये देखील देण्यास तयार असतात. त्यामुळे दूध विक्रेत्यांना देण्यात येणारा दर कमी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: Milk producers get Rs 28 per liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.