दूध महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2017 04:43 AM2017-01-09T04:43:11+5:302017-01-09T04:43:11+5:30
परराज्यातील दूध संघांची घुसखोरी मोडीत काढण्यासाठी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ एकत्रित आले आहेत.
पुणे : परराज्यातील दूध संघांची घुसखोरी मोडीत काढण्यासाठी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ एकत्रित आले आहेत. त्यांनी दूध खरेदीदरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, तर विक्रीतही प्रतिलिटर २ रुपये वाढ करून ग्राहकांच्या खिशालाही कात्री लावण्याचा प्रयत्न केला आहे. ही दरवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
पुण्यातील कात्रज दूध संघात रविवारी सहकारी व खासगी दूध संघांची बैठक झाली. यात दूधखरेदी व विक्रीदरात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दरवाढीची माहिती दिली. गाईच्या दूधखरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ करण्यात आलेली आहे. सध्याचा शासनाचा २२ रुपये दर असून आता ३ रुपयांनी वाढ केल्याने तो २५ रुपये झाला आहे. मात्र तो ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी असेल. दूध विक्रीदरामध्येही तीन रुपये वाढ होणार आहे. मात्र ग्राहकांसाठी दोन रुपये वाढ व एक रुपया डीलर व डेअरी सहन करेल. म्हणजेच ४० रुपये असणारा विक्रीदर आता ४२ रुपये होईल. तसेच म्हैस दूधविक्रीचे एमआरपीमध्येदेखील दोन रुपये वाढ होऊन ते ५४ रुपये होणार आहे.
परराज्यातील दूध संघांची घुसखोरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील सहकारी व खासगी दूध संघ एकत्रित आले असून भविष्यात वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांना फटका
च्गाईच्या दूधखरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ करण्यात आलेली आहे. सध्याचा शासनाचा २२ रुपये दर असून आता ३ रुपयांनी
वाढ केल्याने तो २५ रुपये झाला आहे. हा दर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी असेल. दूध विक्रीदरामध्येही तीन रुपये वाढ होणार आहे. मात्र ग्राहकांसाठी दोन रुपये वाढ व एक रुपया डीलर व डेअरी सहन करेल. म्हणजेच ४० रुपये असणारा विक्रीदर आता ४२ रुपये होईल. तसेच म्हैस दूधविक्रीचे एमआरपीमध्येदेखील दोन रुपये वाढ होऊन ते ५४ रुपये होईल.