गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी मे महिन्यात निघणार
By Admin | Published: January 12, 2016 02:46 AM2016-01-12T02:46:34+5:302016-01-12T02:46:34+5:30
मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या घरांची लॉटरी मे महिन्यात काढण्यात येणार आहे. या लॉटरीमध्ये २ हजार ९00 घरांचा समावेश
मुंबई : मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या घरांची लॉटरी मे महिन्यात काढण्यात येणार आहे. या लॉटरीमध्ये २ हजार ९00 घरांचा समावेश असल्याचे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले. या लॉटरीतील घरांची किंमत येत्या आठवड्यात निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बंद गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार म्हाडामार्फत बांधण्यात आलेल्या
६ हजार ९२५ घरांची लॉटरी २0१२ मध्ये काढण्यात आली असून
या घरांचा ताबा कामगारांना देण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यापर्यंत १0
हजार घरांची सोडत काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिले होते. मात्र, प्रत्यक्षात मे
मध्ये २ हजार ९00 घरांची
लॉटरी काढण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्र्यांनी स्पष्ट केले
आहे. त्यामुळे या वर्षीही अधिक गिरणी कामगारांना घरे मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)