गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर उतरणार

By Admin | Published: March 9, 2015 02:03 AM2015-03-09T02:03:39+5:302015-03-09T02:03:39+5:30

मोफत घरांच्या मागणीसाठी गिरणी कामगार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे. विरोधी पक्षात असताना भाजपने मोफत घरे देण्याचे आश्वासन दिले होते.

Mill workers will be on the road again | गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर उतरणार

गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर उतरणार

googlenewsNext

मुंबई : मोफत घरांच्या मागणीसाठी गिरणी कामगार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे. विरोधी पक्षात असताना भाजपने मोफत घरे देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करावे यासाठी गिरणी कामगार एकजूट संघटनेने १२ मार्चला सकाळी १० वाजता राणीबाग ते आझाद मैदानापर्यंत धडक मोर्चाची हाक दिली आहे. यावेळी राज्यातील हजारो गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार उपस्थित राहणार आहेत.
गेली अनेक वर्षे कामगारांकडून ही मागणी होत आहे. सरकारमार्फत एमएमआरडीएची १८ ते २० लाख किंमतीची घरे गिरणी कामगारांना परवडणारी नसून ती दलालांच्या घशात जाण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे. या धडक मोर्चामध्ये गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघ, सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार सेना, गिरणी कामगार सुरक्षा, मुंबई गिरणी कामगार युनियन (आयटक), एन.टी.सी.एस.सी/एस.टी. असोसिएशन इत्यादी संघटना सामील होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Mill workers will be on the road again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.