एनए प्रकरणात कोट्यवधींचा घोटाळा
By admin | Published: July 18, 2014 02:38 AM2014-07-18T02:38:14+5:302014-07-18T02:38:14+5:30
राज्यात महायुतीचे सरकार आल्यास आघाडी सरकारने घाई-घाईने घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार केला जाईल.
औरंगाबाद : राज्यात महायुतीचे सरकार आल्यास आघाडी सरकारने घाई-घाईने घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार केला जाईल. एनए-४४ प्रकरणी सरकारने हजारो कोटींच्या मोबदल्यात हा निर्णय घेतल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे केला.
तावडे म्हणाले, नगरविकास खात्याने घेतलेल्या सर्व निर्णयांचा फेरविचार आमच्या सरकारच्या काळात केला जाईल. या निर्णयामागे मोठे लागेबांधे आहेत. हा निर्णय पूर्वीच झाला असता तर सामान्या नागरिकांना स्वस्तात घरे मिळाली असती.
निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय बिल्डरांना खुश करण्यासाठी असून, त्यामुळे सामान्य जनतेला काहीही फायदा होणार नसल्याचे आ.तावडे म्हणाले. (प्रतिनिधी)