खोटे बोललेलं गळून पडू नये म्हणून लाखोंचा मेकअप केला जात असावा - धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 06:22 PM2018-01-20T18:22:56+5:302018-01-20T18:23:04+5:30

श्री देवेंद्र फडणवीस हे  देखणे आहेत त्यामुळे त्यांना सुंदर दिसण्यासाठी तशी मेकअपची गरज नाही . मात्र मुख्यमंत्री म्हणून ते राज्यातील जनतेला  रेटून खोटे बोलतात.

Million people should be made to make false propaganda, says Dhananjay Munde's chief | खोटे बोललेलं गळून पडू नये म्हणून लाखोंचा मेकअप केला जात असावा - धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला 

खोटे बोललेलं गळून पडू नये म्हणून लाखोंचा मेकअप केला जात असावा - धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला 

Next

नांदेड - श्री देवेंद्र फडणवीस हे  देखणे आहेत त्यामुळे त्यांना सुंदर दिसण्यासाठी तशी मेकअपची गरज नाही . मात्र मुख्यमंत्री म्हणून ते राज्यातील जनतेला  रेटून खोटे बोलतात हे खोटे रेटून बोललेले गळून पडू नये म्हणून कदाचित त्यांच्या  मेकअप वर लाखोंचा खर्च केला जात असावा असा टोला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यात सुरु असलेल्या  हल्लाबोल यात्रेच्या पाचव्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित भव्य मोर्चा आणि त्यानंतरच्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री श्रीअजितदादा पवार , प्रवक्ते नवाब मलिक, सौ चित्राताई वाघ आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम संग्राम कोते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मी मुख्यमंत्री बोलतोय या मुख्यमंत्र्यांवर चित्रीत होणा-या कार्यक्रमावर होणारा लाखोंच्या खर्चाचा मुद्दा मागील 2 दिवसापासून गाजत आहे त्याचा संदर्भ घेत श्री मुंडे यांनी वरील टोला लगावला. मुख्यमंत्री यांच्या मेकअप आणि चेह-यावर प्रकाश टाकण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचा मेक ओव्हर नीट करा आणि विकास कामांवर नीट प्रकाश टाका असेही ते म्हणाले . 

भाजप-सेनेच्या कार्यकाळात प्रत्येक घटक संपावर जातोय. कामगार, शेतकरी, डॉक्टर, बँक कर्मचारी सर्वच संपावर जातायत. या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून आता या सरकारलाच संपावर पाठवावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Million people should be made to make false propaganda, says Dhananjay Munde's chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.