तूर डाळ खरेदीने शेतकरी कंपन्या झाल्या लक्षाधीश

By Admin | Published: March 20, 2017 08:52 AM2017-03-20T08:52:30+5:302017-03-20T08:53:02+5:30

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण संस्था (आत्मा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १० शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

Millionaire firms become farmers farmers by buying tur dal | तूर डाळ खरेदीने शेतकरी कंपन्या झाल्या लक्षाधीश

तूर डाळ खरेदीने शेतकरी कंपन्या झाल्या लक्षाधीश

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत/विवेक चांदूरकर

बुलडाणा, दि. 20 - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण संस्था (आत्मा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १० शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांना हमी भावात तूर खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले असून, यातून मिळणाऱ्या कमिशनच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांचा फायदा झाला आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकरी यापासून लाभान्वित झाले आहेत. राज्य शासनाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक बँकेच्या अर्थहाय्याच्या मदतीने जिल्ह्यात शेतकरी बचत गट स्थापण करण्यात आले. या बचतगटांना एकत्र करून दहा शेतकरी कंपन्या स्थापण करण्यात आल्या.

शासनाने यावर्षी तूरीला ५०४० रूपये हमीभाव दिला आहे. जिल्ह्यात सात ठिकाणी नाफेडने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. मात्र, सध्या बाजारात तुरीचे भाव पडले असून, केवळ ३२०० ते ३५०० रूपयांमध्ये तुरीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गर्दी करीत आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी नाफेडचे केवळ सातच खरेदी केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होवू नये म्हणून शेतकरी कंपन्यांना हमीभावात तूर खरेदी करण्याचे अधिकार शासनाच्यावतीने देण्यात आले.

शेतकरी कंपन्यांची तूर खरेदीसाठी सब एजंट म्हणून नेमणूक करण्यात आली. जिल्ह्यात दहा शेतकरी कंपन्या तुरीची खरेदी करीत आहेत. १५ मार्चपर्यंत आत्मांतर्गत असलेल्या दहा शेतकरी कंपन्यांनी ३४ हजार ७० क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. तूर खरेदीवर शेतकरी कंपन्यांना एक टक्के कमीशन देण्यात येणार आहे. शेतकरी कंपन्यांनी हजारो क्विंटल तूर खरेदी केली असल्यामुळे त्यांना लक्षावधी रूपयांचा फायदा झाला आहे.

जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांमध्ये इंद्रधनू शेतकरी उत्पादक कंपनी देऊळघाट, केळवद शेतकरी उत्पादक कंपनी केळवद, अमडापूर शेतकरी उत्पादक कंपनी अमडापूर, विठुमाऊली शेतकरी उत्पादक कंपनी देऊळगाव माळी, डोणगाव शेतकरी उत्पादक कंपनी डोणगाव, नळगंगा अ‍ॅग्रो प्रो. कंपनी मोताळा या सहा कंपन्यांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यात आणखी चार कंपन्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र स्थापण केल्या आहेत. यामध्ये जय सरदार कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी भोरटेक, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी कुंड खु., मुक्ताई कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण शेतमाल उत्पादन कंपनी वरवट बकाल, पिंपळगाव देवी शे. उ. कं. पिंपळगाव देवी, श्री सुपो शे.उ.कं.लि. निमगाव ता. नांदूरा या कंपन्यांचा समावेश आहे.

 

या कंपन्यांना झाला फायदा

कंपनीचे नाव              तूरीची खरेदी (टन)            कंपन्यांचा नफा (लाखात)

इंद्रधनू शे. कंपनी           २४८.७०                            १.२५६

केळवद शे. कं.              ४२०.००                              २.१२१

अमडापूर शे. कं.            ५५०.००                             २.७७८

विठुमाऊली शे.कं.          २१४.९०                              १.०८५

डोणगाव शे. कं.            २२५.००                              १.१३६

नळगंगा अ‍ॅ. प्रो.            २००.००                             १.०१०

जय सरदार शे.कं.           १३००.००                           ६.५६५

संत गाजनन शे.कं.          ३४९.००                         १.७६२

मुक्ताई शे. कं.               ३६६.५०                            १.८५१

पिंपळगाव देवी            २३५.००                               १.१८७

श्री सुपो शे.कं.                ३५०.००                             १.७६८

 

नफ्याचे होणार समान वाटप जिल्ह्यात शेतकरी बचतगटांचे एकत्रीकरण करून कंपन्या स्थापण करण्यात आल्या. बचतगटांमध्ये असलेले सर्वच शेतकरी कंपनीमध्ये समान भागीदार आहेत. त्यामुळे कंपनीला झालेल्या नफ्याचे शेतकऱ्यांना समान वाटप करण्यात येते.

 शासनाने शेतकरी कंपन्यांची सब एजंट म्हणून हमीभावात तूर खरेदी करण्यासाठी नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांना हमीभावाच्या रकमेच्या एक टक्के कमीशन मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी कंपन्यांना परिणामी शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा फायदा झाला आहे. - योगेश अघाव समन्वयक, आत्मा. बुलडाणा

 

Web Title: Millionaire firms become farmers farmers by buying tur dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.