कुंभमेळ्यात अतिथींवर कोट्यवधींचा खर्च

By admin | Published: October 11, 2015 03:54 AM2015-10-11T03:54:59+5:302015-10-11T03:54:59+5:30

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेल्या भाविक व साधू-महंतांच्या सुविधांसाठी अडीच हजार कोटी रुपये खर्ची पडल्याचे कवित्व अजूनही सुरूच असून, महिनाभराच्या पुण्यपर्वात नाशिक

Millions of crores spent on guests in Kumbh Mela | कुंभमेळ्यात अतिथींवर कोट्यवधींचा खर्च

कुंभमेळ्यात अतिथींवर कोट्यवधींचा खर्च

Next

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेल्या भाविक व साधू-महंतांच्या सुविधांसाठी अडीच हजार कोटी रुपये खर्ची पडल्याचे कवित्व अजूनही सुरूच असून, महिनाभराच्या पुण्यपर्वात नाशिक व त्र्यंबकेश्वरी भेट देणाऱ्या ‘राज्य अतिथीं’च्या सरबराईवर करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या खर्चावरही आता चर्चा सुरू झाली आहे.
सरकारचे अतिथी म्हणून मानसन्मान घेतानाच नाशिकच्या प्रसिद्ध वस्तूही भेट म्हणून जबरदस्तीने अतिथींनी नेल्या आहेत. सरकारशी संबंधित मामला असल्यामुळे खुल्यापणाने या विषयावर शासकीय अधिकारी बोलत नसले तरी झालेला खर्च कसा वसूल करावा, या विवंचनेत ते आहेत. यंदाच्या कुंभात केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे सदस्य, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, सचिव व शेकडो सनदी अधिकाऱ्यांनी रामकुंड व त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तात स्नान करून पुण्य पदरात पाडून घेतले. राजशिष्टाचाराप्रमाणे ‘व्हीआयपी’ पाहुण्यांना शासकीय मान-सन्मान देण्याची जबाबदारी स्थानिक यंत्रणेवर टाकण्यात आल्याने साहजिकच जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तलाठ्यांपर्यंत साऱ्यांनाच कामाला लावण्यात आले होते. मात्र त्यासाठी खर्चाची कोणतीही तजवीज केली नाही. साईबाबांनाही सरकारी खर्चाने साकडे घातले. (प्रतिनिधी)

अतिथींनी हक्काने दिमतीला असलेल्या अधिकाऱ्यांकडून नाशिकच्या प्रसिद्ध वस्तूही जबरदस्तीने मागवून सोबत नेल्या, काहींनी भाजीपालादेखील जाताना घरी नेल्याच्या सुरस कथा आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या खर्चात यातील कोणत्याही खर्चाचा समावेश नाही.

व्हीआयपी अतिथी
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, राज्यपाल सी. विद्यासागर राव, दिल्ली विधानसभा अध्यक्ष गोयल, राज्य मंत्रिमंडळातील पंकजा मुंडे, विष्णू सावरा, दीपक सावंत, राजकुमार बडोले, राम शिंदे, दीपक केसकर, रणजित पाटील यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, अन्य राज्यांचे राज्यपाल यांनी हजेरी लावली.

रिक्षानेही फिरले पाहुणे
रेल्वेने व खासगी वाहनांनी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सरबराईसाठी शासकीय यंत्रणेला महत्प्रयास करावे लागले. शासकीय वाहन वेळेत उपलब्ध न होऊ शकल्याने पाहुण्यांची रिक्षातून ने-आण करावी लागली.

Web Title: Millions of crores spent on guests in Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.