मृत व्यक्तींच्या नावे लाखोंचा निधी फस्त

By Admin | Published: October 8, 2016 02:24 AM2016-10-08T02:24:59+5:302016-10-08T02:27:57+5:30

तालुक्यातील अनेक लोकांना काम करूनही घामाचे पैसेच मिळाले नाहीत.

Millions of fishermen in the names of deceased persons | मृत व्यक्तींच्या नावे लाखोंचा निधी फस्त

मृत व्यक्तींच्या नावे लाखोंचा निधी फस्त

googlenewsNext

राहुल वाडेकर,

विक्रमगड- तालुक्यातील अनेक लोकांना काम करूनही घामाचे पैसेच मिळाले नाहीत. यापेक्षा ज्या व्यक्ती हयात नाहीत, अशा लोकांच्या नावाने पैसे काढून अपहार केल्याचे निदर्शनात आले आहे. रोजगार हमीच्या योजना कागदावरच रंगल्या असून हयात नसलेल्या व्यक्तींच्या नावाने पैसे काढून ठेकेदार व अधिकाऱ्यांनी लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचे पुढे आले आहे.
तालुक्यातील खुडेद येथे शंभर आदिवासी समाजाची कुटुंब असलेली वस्ती असून येथे रोजगार हमी योजनेतून अनेक रस्त्यांची कामे झाल्याचे चित्र कागदावर पाहायला मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षामध्ये ही कामे झालीच नसल्याचे दिसून येत आहे. सही करणाऱ्या व्यक्तीचे अंगठे टेकवून व अनेक मृत व्यक्तींच्या नावे तसेच अविवाहित तरु णांच्या पत्नीच्या नावे पैसे काढण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून हा सर्व पैसा वसूल करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी व आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे शाखाप्रमुख लहू नडग यांनी केली आहे. दरम्यान, पूर्ण पालघर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप युवा स्पर्श सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन विलास भोईर यांनी केला आहे.
आर्थिक वर्ष २०१४-१५, २०१६-१७ या कालावधीमध्ये खुडेद ग्रामपंचायतींतर्गत १२ पाड्यांच्या महात्मा गांधी रोजगार हमी कामांत मोठी अफरातफर व मोठा गैरव्यवहार झाल्याचे आदिवासी विद्यार्थी कृती समितीने केलेल्या आरोपात म्हटले आहे. याबाबत मोठे पुरावे म्हणजे १) खुडेद महालेपाडा ते खोरीपाडा रस्ता २) खुडेद माऊलीपाडा ते बिरारीपाडा रस्ता ३) खुडेद म्हसेपाडा ते स्मशानभूमी रस्ता ४) खुडेद गारमाळ ते भोयेपाडा रस्ता ५) मेन रोड ते धर्मा धवलू गावित रस्ता ६) मैदान सपाटीकरण जि.प. शाळा बोरसेपाडा ७) मैदान सपाटीकरण जि.प. शाळा बिरारीपाडा हे रस्ते व सपाटीकरणाची कामे अर्धवट असून यामध्ये अनेक त्रुटी आहेत.
त्याचप्रमाणे या कामावर मजुरी करणाऱ्यांच्या रोजगाराचा निधी परस्पर लाटल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच अनेक स्थलांतरित मजुरांच्या नावावर निधी हडपल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थी कृती समितीने केला आहे.
>मृत व्यक्तींच्या नावाने काढलेल्या रकमा
काशिनाथ नवसू काकवा - ५३७, १०२०, १०१४ रुपये
गंगू महादू खाटेरा - ५३७ , १०२०, १०१४, ८८८, एकूण ४५०९ रुपये
विष्णू काळू शेंडे - ५३७, १०२०, १०१४, ८८८, १०५० एकूण ४५०९ रुपये
काशिनाथ जिव्या बिरारी - ५३७, १०२०, १०१४, ८८८, १०५६ एकूण = ४५०९ रुपये
काळू सोनू शिंदे -५३७ रुपये
>लग्नाअगोदरच रोजगार हमी योजनेत हात पिवळे : रोजगार हमी योजनेतून पैसे लाटणारे अधिकारी, ठेकेदार नवनवीन शकली लढवत आहे. विशेष म्हणचे कमलाकर लक्ष्मण पटारा याचे लग्न झाले नसतानाही त्याच्या पत्नीच्या नावावर २/०८/२०१५ रोजी १०१४, ९५४, १०१४, ९५४ इतक्या रकमा काढल्या आहे.
>कृती समितीच्या मागणीकडे दुर्लक्ष
आदिवासी विद्यार्थी कृती समितीने माहितीच्या अधिकारात या गैरव्यवहाराबाबत सर्व पुरावे गोळा केले आहेत. याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी विक्रमगड व जिल्हा अधिकारी कार्यालय, पालघर यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याबाबत २०/०९/२०१६ रोजी सकाळी मीटिंग बोलवली होती. तीही रद्द करण्यात आली.
त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी विक्रमगड यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून या गैरप्रकाराबाबत बैठक बोलवण्याबाबत विनंती करूनही जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून व पंचायत समिती विक्र मगड कार्यालयाकडून जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थी कृती समितीने केला आहे

Web Title: Millions of fishermen in the names of deceased persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.