इंटिग्रेटेड प्रवेशाच्या नावाखाली लाखोंची लूट

By Admin | Published: June 24, 2015 04:36 AM2015-06-24T04:36:03+5:302015-06-24T04:36:03+5:30

अकरावी, बारावी, एमएच सीईटी आणि जेईई मेन्स परीक्षेसाठी लाखो रुपयांची फी उकळणाऱ्या रेझोनन्स, सिनॅप्स आणि सिन्हाल या खासगी क्लासेसचा गोरखधंदा

Millions of looters in the name of integrated access | इंटिग्रेटेड प्रवेशाच्या नावाखाली लाखोंची लूट

इंटिग्रेटेड प्रवेशाच्या नावाखाली लाखोंची लूट

googlenewsNext

मुंबई : अकरावी, बारावी, एमएच सीईटी आणि जेईई मेन्स परीक्षेसाठी लाखो रुपयांची फी उकळणाऱ्या रेझोनन्स, सिनॅप्स आणि सिन्हाल या खासगी क्लासेसचा गोरखधंदा ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून उघड केला आहे. महाविद्यालयांसोबत आपली सेटिंग असून, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये १०० टक्के गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवत हे क्लासेस पालकांकडून लाखो रुपयांची लूट करत असल्याचे स्टिंगमध्ये निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता राज्य शासन या क्लासेसवर कोणती कारवाई करणार, असा प्रश्न आहे.
आपल्याला जे मिळाले नाही, ते आपल्या पाल्याला मिळावे, या आशेपोटी पालक लाखो रुपये भरून या आमिषाला बळी पडत असल्याचेही स्टिंगमध्ये समोर आले आहे. क्लासेसच्या या प्रकाराबाबत ‘लोकमत’ने महाविद्यालयांमध्ये पालक म्हणून जाऊन उलटतपासणीही घेतली. त्यात काही महाविद्यालयांच्या नकळत हा धंदा सुरू असल्याचे लक्षात आले; तर काही महाविद्यालयांतील कर्मचारी क्लासेससोबत मिळून हा धंदा करत असल्याचे उघड झाले.

Web Title: Millions of looters in the name of integrated access

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.