MIMच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानं औरंगाबाद मनपाच्या सर्वसाधारण सभेत राडा, 2 जण निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 12:30 PM2017-08-19T12:30:18+5:302017-08-19T13:14:13+5:30

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' म्हणण्यावरुन वाद झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

MIM councilors refuse to call 'Vande Mataram', Rada at the General Meeting of Aurangabad Municipal Corporation | MIMच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानं औरंगाबाद मनपाच्या सर्वसाधारण सभेत राडा, 2 जण निलंबित

MIMच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानं औरंगाबाद मनपाच्या सर्वसाधारण सभेत राडा, 2 जण निलंबित

googlenewsNext

औरंगाबाद, दि. 19 - औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' म्हणण्यावरुन वाद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्याने मनपाच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. 

औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहात एमआयएमच्या नगसेकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानं यावेळी शिवसेना-भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले.  एमआयएमचे नगरसेवक व शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांमध्ये राडादेखील झाला.  तसेच एमआयएमचे नगरसेवक व युतीच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 

सर्वसाधारण सभेत नेमके काय घडले?

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ' वंदे मातरम्'  सुरू असताना बसून राहिलेल्या एमआयएम व काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना निलंबित करण्यासाठी शिवसेना व भाजपा यांनी आक्रमक पवित्रा घेत सभेत गोंधळ घातला. अखेर महापौरांनी एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख या दोघांचे एक दिवसासाठी निलंबन केले आहे. 

'वंदे मातरम्' म्हणण्याला विरोध दर्शवण्यासाठी एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख हे नगरसेवक सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' सुरू असताना बसून राहिले होते. यावर शिवसेना व भाजप सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दोन्ही नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी करत युतीच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. या गदारोळानंतर शेवटी महापौर भगवान घडामोडे यांनी सय्यद मतीन व सोहेल शेख या दोन्ही नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केले.

वंदे मातरम् कदापि म्हणणार नाही - अबू आझमी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ‘वंदे मातरम’ म्हणण्याची सक्ती करण्याच्या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. ‘आम्हाला देशातून बाहेर काढलं तरी चालेल, पण आम्ही कधीही वंदे मातरम म्हणणार नाही’, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे.
मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्रातही तशी सक्ती लागू करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी पत्रकारांना सांगितले होते.

यासंदर्भात आझमी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी विरोधी भूमिका घेतली होती. 'वंदे मातरम्'चा मी सन्मान करतो; मात्र माझा धर्म मला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे मी 'वंदे मातरम्' म्हणणार नाही. माझ्यावर कारवाई झाली, मला जेलमध्ये टाकले वा देशाबाहेर काढले तरी मी यावर ठाम असेन, असे आझमी म्हणाले. एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनीही आझमी यांच्या सुरात सूर मिसळला. माझ्या मानेवर सुरी ठेवली वा माझ्यावर गोळी झाडली तरी मी वंदे मातरम म्हणणार नाही, असे पठाण म्हणाले होते.

Web Title: MIM councilors refuse to call 'Vande Mataram', Rada at the General Meeting of Aurangabad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.