MIM ने कोअर कमिटी केली बरखास्त

By admin | Published: March 6, 2017 06:06 PM2017-03-06T18:06:16+5:302017-03-06T18:06:16+5:30

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांपुरतीच ही कमिटी गठीत करण्यात आली होती असं सांगत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कमिटी बरखास्त केली आहे

The MIM dismisses the Core Committee | MIM ने कोअर कमिटी केली बरखास्त

MIM ने कोअर कमिटी केली बरखास्त

Next
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 6 - महाराष्ट्रातील एमआयएमची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. एमआयएमने राज्यात 9 सदस्यांची कोअर कमिटी तयार केली होती. मात्र जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांपुरतीच ही कमिटी गठीत करण्यात आली होती असं सांगत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कमिटी बरखास्त केली आहे. 
 
असदुद्दीन ओवेसी जरी वेगळं कारण सांगत असले तरी पुणे, सोलापूर आणि मुंबईत पक्षाला अपेक्षित यश  मिळालं नसल्यानेत कोअर कमिटी बरखास्त केल्याचं बोललं जात आहे. 
 
एमआयएमधील अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर येत आहेत. लातूरमध्ये दीड हजार कार्यकर्त्यांनी ओवेसी बंधू आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर पुण्यात एमआयएमचे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख  यांनीजलील यांनी तिकीट वाटपासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. ज्यानंतर त्यांच निलंबन करण्यात आलं.
 

Web Title: The MIM dismisses the Core Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.