‘एमआयएम’च फॅक्टर!

By admin | Published: April 24, 2015 01:45 AM2015-04-24T01:45:20+5:302015-04-24T01:45:20+5:30

हिंदुत्वाचे कार्ड चालवत शिवसेना-भाजपा युतीने सहाव्यांदा औरंगाबाद महानगरपालिका ताब्यात घेतली; पण मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचा प्रबळ

'MIM' factor! | ‘एमआयएम’च फॅक्टर!

‘एमआयएम’च फॅक्टर!

Next

हिंदुत्वाचे कार्ड चालवत शिवसेना-भाजपा युतीने सहाव्यांदा औरंगाबाद महानगरपालिका ताब्यात घेतली; पण मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून झालेला उदय हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य. याचा अंदाज विधानसभा निवडणुकीनंतर आला होता; पण अंतर्गत लाथाळ्यांमुळे हा पक्ष महापालिका निवडणुकीत प्रभावी कामगिरी करू शकणार नाही हा अनेकांचा अंदाज त्यांनी खोटा ठरविला.
२९ जागा जिंकून शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. पूर्वी त्यांच्या ३० जागा होत्या; पण त्या वेळी ९९ वार्ड होते, आता ते ११३ झाले. त्या तुलनेत त्यांची शक्ती वाढली नाही. उलट महापौर कला ओझा आणि माजीमहापौर अनिता घोडेले या पराभूत झाल्या. गुलमंडी हा सेनेचा गड. येथे विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आताही सेनेला येथे बंडखोरांनी धूळ चारली.
खा. चंद्रकांत खैरे यांनी महापालिका जिंकली असली तरी महापौर कला
ओझा आणि त्यांचे पुतणे सचिन खैरे हे त्यांचे दोन उमेदवार पराभूत झाले. समर्थनगरातून त्यांचा मुलगा हृषीकेश निवडून आला. या
तीन जागा खैरे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या
होत्या. गुलमंडीत पप्पू व्यास यांची बंडखोरी त्यांना शमविता आली नाही, तर बाळकृष्णनगरातील संताप मतपेटीत व्यक्त झाला. जागांचा विचार करता सेनेसाठी काळजी करण्यासारखे आहे.

Web Title: 'MIM' factor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.