MIM-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती होणार?; खा. इम्तियाज जलील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 03:11 PM2022-10-12T15:11:29+5:302022-10-12T15:12:22+5:30

एमआयएमला फायदा मिळेल, नाही मिळणार ही वेगळी गोष्ट आहे. शिवसेनेबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे असं इम्तियाज जलील म्हणाले.

MIM-Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Alliance?; MP Imtiaz Jaleel spoke clearly | MIM-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती होणार?; खा. इम्तियाज जलील म्हणाले...

MIM-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती होणार?; खा. इम्तियाज जलील म्हणाले...

googlenewsNext

औरंगाबाद -  महाराष्ट्रानं कधीही इतके घाणेरडे राजकारण पाहिलं नाही. राजकारण काहीही असो. शिवसेनेसोबत मतभेद असतील. परंतु मराठी अस्मिता शिवसेनेशी जोडलेली होती. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ते दुर्देवी आहे. अमित शाह आणि मंडळींनी मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम केले. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्याशी देणेघेणे नाही. जे कुणाला जमलं नाही ते अमित शाह यांनी मराठी माणसांना कमकुवत करण्याचं पाप केले आहे अशा शब्दात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर निशाणा साधला. 

इम्तियाज जलील म्हणाले की, एमआयएमला फायदा मिळेल, नाही मिळणार ही वेगळी गोष्ट आहे. शिवसेनेबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे. राजकीय मतभेद असतील. मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना उभी राहिली. मीदेखील मराठी माणूस आहे. मराठी लोकांवर कुठे काही झाले तर आपल्यासाठी कुणी उभे आहे या भावनेतून शिवसेना उभी राहिली. शिवसेनेचं धार्मिक रंग वेगळी बाजू आहे. शिवसेना फोडल्यानंतर काहीतरी चेंज झाल्याचं दिसून येते. सत्ता लागण्यासाठी जे कुणी येतील त्यांचे स्वागत असेल अशी भूमिका आहे. मुस्लीम मते राजकारणात टिकण्यासाठी गरजेची पडली. मुस्लीम सॉफ्ट टार्गेट होते आता ते राहणार नाही असं त्यांनी सांगितले. 

MIM-शिवसेना युती होणार?
तसेच शिवसेना हिंदुत्वाच्या आधारावर उभी राहिली आहे. कुणाच्या मनात MIM-शिवसेना एकत्र येतील असं वाटत असेल तर ते शक्य नाही. शिवसेना कुणासोबत जाऊ शकते पण आमच्यासोबत नाही. MIM ची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला मुस्लिमांची मते हवीत. नेतृत्व नको. मुस्लिमांनी मतदान करायचे पण नेते नको. त्यांना नेतृत्व नकोय. आम्ही राजकीय प्रवाहात आलो तेव्हा आम्ही नेतृत्व का करू शकत नाही असं लोकांमध्ये सांगितले. आमचे खासदार, आमदार होऊ शकतात हे दाखवून दिले. तुम्ही आमच्यासोबत बसू शकत नाही अशी मानसिकता इतर राजकीय पक्षात होती. ती MIM ने खोडून काढली अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: MIM-Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Alliance?; MP Imtiaz Jaleel spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.