Bhaskar Jadhav : 'राजा आता तरी विकणे बंद कर', भास्कर जाधवांकडून नरेंद्र मोदींची मिमिक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 02:09 PM2021-11-09T14:09:33+5:302021-11-09T14:10:07+5:30

Bhaskar Jadhav : पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन कार्यकाळामध्ये काहीच केले नाही, हे लोकांच्या आता लक्षात येत असल्याची टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

Mimicking Narendra Modi, Bhaskar Jadhav targeted the price of gas | Bhaskar Jadhav : 'राजा आता तरी विकणे बंद कर', भास्कर जाधवांकडून नरेंद्र मोदींची मिमिक्री

Bhaskar Jadhav : 'राजा आता तरी विकणे बंद कर', भास्कर जाधवांकडून नरेंद्र मोदींची मिमिक्री

googlenewsNext

चिपळूण : राजकारणात अनेकदा नेते एकमेकांची नक्कल करताना आपण पाहिलं आहे. विशेषतः राज ठाकरे इतर नेत्यांनी मिमिक्री करताना दिसतात. पण आता शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हेही मिमिक्री करताना दिसले. मिमिक्री केली तेही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. त्यांच्या भाषणाच्या शैलीची नक्कल करत त्यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे.

नरेंद्र मोदी २०१४ साली सत्तेत येण्यापूर्वी गेल्या ६० वर्षांमध्ये काँग्रेसने काय केले, असा प्रश्न भास्कर जाधव विचारीत होते. सामान्य नागरिकही, काँग्रेसने काहीच केले नाही, असे सांगत त्यांना प्रतिसाद देत होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन कार्यकाळामध्ये काहीच केले नाही, हे लोकांच्या आता लक्षात येत असल्याची टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल करत त्यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडविली. काँग्रेसने आजपर्यंत काहीच केले नाही, असे मोदी आणि सामान्य नागरिकांकडून म्हटले जात होते. मात्र, लोकांची ही भावना आता बदलली आहे. काँग्रेसने जे करुन ठेवलंय ते विकायचं काम बंद कर राजा आणि तुम्ही काहीतरी करा, असे नागरिक नरेंद्र मोदींना सांगत असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.

देशात प्रचंड महागाई झाली आहे. आज घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती किती वाढल्या आहेत? मध्यंतरी मोदी सरकारने उज्ज्वला गॅस योजना आणली. तेव्हा नागरिक नरेंद्र मोदी फुकट गॅस देत आहेत, म्हणून त्यांच्यामागे धावत सुटले. तेव्हा मी सातत्याने सांगत होतो की, मोदी सरकार गॅस फुकट देत नाही. ते तुमचा विश्वासघात करणार आहेत, अनुदान बंद करतील, असे भास्कर जाधव यांनी सांगितले. 


याचबरोबर, एखादा दुकानदार तुम्हाला नंतर पैसे देण्याच्या अटीवर सामान देतो तेव्हा त्याचा अर्थ दुकानदाराने तुम्हाला सामान फुकट नव्हे तर उधारीवर दिले असा होतो. तो तुमच्याकडून सव्याज पैसे घेणार आहे. मोदी सरकारने सामान्यांना घरगुती गॅसवर मिळणारे अनुदान काढून घेतले. या अनुदानामुळे एक वर्ष तुम्हाला गॅस मोफत मिळणार होता. तो अगोदरही मिळत होता. मात्र, मोदी सरकारने हा मोफत मिळणारा गॅस विकत द्यायला सुरुवात करुन लोकांची फसवणूक केल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.

Web Title: Mimicking Narendra Modi, Bhaskar Jadhav targeted the price of gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.