मिनी बसला अपघात, ११ ठार

By admin | Published: March 12, 2017 01:35 AM2017-03-12T01:35:49+5:302017-03-12T01:35:49+5:30

तीन दिवसांची सुट्टी साधून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मुंबईहून निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला अपघात होऊन ११ जण मृत्युमुखी पडले.

Mini bus accident, 11 killed | मिनी बसला अपघात, ११ ठार

मिनी बसला अपघात, ११ ठार

Next

उरुळी-कांचन (जि. पुणे) : तीन दिवसांची सुट्टी साधून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मुंबईहून निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला अपघात होऊन ११ जण मृत्युमुखी पडले. पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी-कांचन येथील इनामदार वस्तीजवळ शनिवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पाच महिला आणि पाच पुरुषांसह एका मुलीचा समावेश आहे. हे सर्व जण मुंबईतील मुलुंड आणि पुण्याजवळील अणे (ता. जुन्नर) येथील रहिवासी आहेत.
मुलुंड येथून ज्योती कंपनीची प्रवासी बस अक्कलकोटला जात होती. उरळी-कांचन येथील मोटे यांच्या शेताजवळ बसच्या पुढे रानडुक्कर आडवे आले, त्याला वाचविण्याच्या नादात बसचालकाचा ताबा सुटला. रानडुकराला बस धडकल्यामुळे ते जागेवरच मृत झाले. त्याच्या अंगावरून ही बस जोरात दणका बसून उंच उडाली व रस्तादुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या १० चाकी अवजड वाहतूक करणाऱ्या मालट्रकला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ट्रकने बसला जवळपास ५० फूट फरफटत नेले. जयवंत नामदेव चव्हाण (वय ४८), योगिता जयवंत चव्हाण (४४), रेवती जयवंत चव्हाण (१४, तिघेही रा. यशोदाप्रसाद अपार्टमेंट, सज्जनवाडी, मुलुंड पूर्व). प्रदीप रामचंद्र अवचट (४९) आणि त्यांची पत्नी सुलभा (४४, रा. अणे, ता. जुन्नर, जि. पुणे), विजय बाळकृष्ण काळे (५८) आणि त्यांची पत्नी ज्योती (५८) (रा. नीता अपार्टमेंट, चाफेकर बंधू मार्ग, मुलुंड पूर्व), योगेश रामचंद्र लोखंडे (२३, रा. नवघर, कॅम्पस हॉटेलजवळ, मुलुंड पूर्व), शैलजा जगदीश पंडित (६८, रा. वसंत बंगला, तरखड, वसई प., जि. पालघर), कविता जय गीते (२८, जयगोपीनाथ चाळ, आगाबन अपार्टमेंट, ठाणे) तसेच लक्झरी बसचालक केतन सुरेश पवार (२९, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. (वार्ताहर)

ट्रकचालक जखमी
- कस्तुरी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी तातडीने धावून आले. त्यांच्या मदतीने व क्रेनच्या साह्याने पोलिसांनी जखमींना तत्काळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण सर्व जण मृतावस्थेत आढळले.
ट्रकचालक अमोल ज्ञानदेव गायकवाड (२३, रा. शेळगाव (आर) जि. सोलापूर.) यांच्या बोटाला दुखापत झाली तर क्लीनर सचिन सुतार (२१, रा. पिंपरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर याच्या पाठीला मार बसून तो किरकोळ जखमी झाला आहे.

Web Title: Mini bus accident, 11 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.