मिनीबस-ट्रक अपघात; तिघांचा मृत्यू, १० जखमी

By admin | Published: June 1, 2017 03:19 AM2017-06-01T03:19:37+5:302017-06-01T03:19:37+5:30

ट्रकने मिनीबसला धडक दिल्याने तिघे जण जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य १० जण जखमी झाले़ पुणे-सोलापूर महामार्गावर

Minibus-truck accident; Three killed, 10 injured | मिनीबस-ट्रक अपघात; तिघांचा मृत्यू, १० जखमी

मिनीबस-ट्रक अपघात; तिघांचा मृत्यू, १० जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगळवेढा (सोलापूर) : ट्रकने मिनीबसला धडक दिल्याने तिघे जण जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य १० जण जखमी झाले़ पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर बाह्यवळण रस्त्याजवळ (बायपास रोड) बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
रियाज सुतार, कल्पना सुतार अशी मृतांची नावे आहेत. एकाचे नाव समजलेले नाही. जखमींवर सोलापूर व अकलूज येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात उमर सुतार यांचे हृदयविकाराने निधन झाले होते़ त्यांचे पार्थिव घेऊन नातेवाईक मिनीबसने मंगळवेढ्याकडे येत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Minibus-truck accident; Three killed, 10 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.