भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं : अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 11:45 AM2020-02-17T11:45:45+5:302020-02-17T11:45:53+5:30

सरकार पाडण्याचे नसते उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी,असेही चव्हाण म्हणाले.

Minister Ashok Chavan criticizes BJP | भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं : अशोक चव्हाण

भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं : अशोक चव्हाण

googlenewsNext

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षातील नेते आणि मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याने हे सरकार कधीही पडू शकते असं विरोधीपक्षांच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तर यावरून माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीमधील तीनही पक्षामध्ये उत्तम समन्वय आहे. कुठलेही वादाचे मुद्दे येणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. तरीही असा एखादा मतभेद असल्याचा विषय समोर आल्यास, तो प्रश्न सोडवण्यासाठी एक समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थित चर्चा होऊ शकते.

तर पाच वर्षे सत्तेत राहून सुद्धा लोकांनी विरोधकांना नाकारलं असल्याने, ही त्यांच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीच सरकार राहू नयेत असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र हे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं. तसेच सरकार पाडण्याचे नसते उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी,असेही चव्हाण म्हणाले.

Web Title: Minister Ashok Chavan criticizes BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.