व्यासपीठावरच मंत्री छगन भुजबळ ढसढसा रडले; हरी नरकेंच्या आठवणीनं भावूक झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 07:54 PM2023-08-12T19:54:42+5:302023-08-12T19:56:25+5:30

सगळीकडून जेव्हा वार होतायेत तेव्हा कुणीतरी सपोर्ट लागतो, वैचारिक आधारस्तंभ लागतो तो आधारस्तंभच गेला असं त्यांनी भाषणात म्हटलं.

Minister Chhagan Bhujbal sheds tears in memory of Hari Narake, The memory of Hari Narake became very emotional | व्यासपीठावरच मंत्री छगन भुजबळ ढसढसा रडले; हरी नरकेंच्या आठवणीनं भावूक झाले

व्यासपीठावरच मंत्री छगन भुजबळ ढसढसा रडले; हरी नरकेंच्या आठवणीनं भावूक झाले

googlenewsNext

मुंबई – ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक हरी नरके यांचं अलीकडेच निधन झाले. नरके यांच्या निधनानं सामाजिक चळवळीला मोठा फटका बसला. नरकेंना श्रद्धांजली देण्यासाठी मुंबईत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत मंत्री छगन भुजबळ यांना अश्रू अनावर झाले. हरी नरकेंच्या आठवणीत भुजबळ ढसाढसा रडले.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह आम्ही सगळे कार्यक्रमात होतो. तेव्हा अचानक आमचे सहाय्यक मला कानात येऊन सांगतात, हरी नरके बैठकीसाठी निघाले होते पण त्यांना वाटेतच वांत्या झाल्या असा फोन आला. मी म्हटलं मी येतो बघायला पण समोरून सांगितले ते गेले. माझ्या तोंडातून शब्द फुटेना, डोकं बधीर झाले. काही सांगितले त्यावर विश्वास बसेना, समीर हॉस्पिटलला पोहचला. त्यालाही डॉक्टरांनी परिस्थिती सांगितली. फुले, शाह, आंबेडकर या पुरोगामी लढाईत....असं बोलताना मध्येच भुजबळांना अश्रू अनावर झाले. त्यांना पुढे काहीही बोलता आले नाही. डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या.

सगळीकडून जेव्हा वार होतायेत तेव्हा कुणीतरी सपोर्ट लागतो, वैचारिक आधारस्तंभ लागतो तो आधारस्तंभच गेला. याच हॉलमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केले. फुले, शाहू आंबेडकर म्हटल्यावर कुणालाही अंगावर घ्यायला आणि लढायला तयार, पण नुसतं लढायचं म्हणजे काही अभद्र शब्द वापरून किंवा असं नाही तर पुराव्यासहित..प्रबोधनाच्या चळवळीची सुरुवात करायची असेल तर स्वत:पासून करायची असं त्यांनी सांगितले म्हणून ते आईला बोलले, मी काहीही करेल, मी आंतरजातील विवाह करेल, मुलगी तू ठरव आणि त्या लग्नाला प्रत्यक्ष पु.ल देशपांडे त्यांच्या पाठिशी उभे राहिले आणि त्यांनीच सगळे केले अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.

Web Title: Minister Chhagan Bhujbal sheds tears in memory of Hari Narake, The memory of Hari Narake became very emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.