आमचं कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग...; चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटातील नेत्याने दिले प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 02:40 PM2022-10-07T14:40:18+5:302022-10-07T14:40:50+5:30

दोन अडीच वर्ष मी सरकार येणार म्हणत होतो, मी काय वेडा नव्हतो असं बोलायला. आम्ही सर्व प्लॅनिंगमध्ये होतो. ४० जणांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठीची यंत्रणा माझ्या मनात होत्या. असा दावा काल भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला.

Minister Deepak Kesarkar responded to Shiv Sena party split claim made by BJP leader Chandrakant Patil | आमचं कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग...; चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटातील नेत्याने दिले प्रत्युत्तर

आमचं कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग...; चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटातील नेत्याने दिले प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई: दोन अडीच वर्ष मी सरकार येणार म्हणत होतो, मी काय वेडा नव्हतो असं बोलायला. आम्ही सर्व प्लॅनिंगमध्ये होतो. ४० जणांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठीची यंत्रणा माझ्या मनात होत्या. असा दावा काल भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. या दाव्याला आज शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. 

आम्ही अशा पद्धतीचे कोणतेही प्लॅनिंग केले नव्हते. हा आमचा उत्स्फुर्त उठाव होता. आमचा हा उठाव काही तत्वांसाठी होता. आमचं या संदर्भात अगोदर कोणतही प्लॅनिंग नव्हते, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.  

आपापसांतील भांडाभांड बंद करा; चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले

भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल काल पुण्यात पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेतील काही किस्से सांगितले. 

"आपापसांतील भांडाभांड बंद करा"

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शंभर नगरसेवक निवडून आले तरच, भाजपने पुणे महापालिका जिंकली असे मी मानेन. ९९ नगरसेवक आल्यावर महापौर आपला होईल; पण भाजपने महापालिका जिंकली असे मी कधीच म्हणणार नाही. त्यामुळे आपापसांतील भांडाभांड बंद करा, अशा स्पष्ट शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले.

चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शहर भाजपच्या वतीने गुरुवारी पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी अशा प्रकारच्या समारंभात वेळही जातो व पैसाही खर्च होतो, या मताचा मी आहे, असे सांगितले. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सत्कार कार्यक्रम संघटनात्मक बांधणीसाठी बळ देईल; त्यासाठीच मी या कार्यक्रमाचा स्वीकार केला असेही त्यांनी नमूद केले.

पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांनी मोठा त्रास दिला. तरीही भाजपचे कार्यकर्ते टिकून राहिले. फडणवीस सरकारचे निर्णय रद्द करणे व खुन्नस काढणे एवढेच काम त्यांनी केले. परंतु, या काळात हे सरकार कसे जाईल असे आमचे नियोजन चालूच होते व शेवटी ते खरे झालेच. आता पुढील काळात खूप मोठी आव्हाने पेलावी लागणार असून, शहरातील रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, जायका प्रकल्प पूर्ण करणे, रिंग रोड, मेट्रो, आदी कामांसाठी अठरा-वीस तास कामाची तयारी सर्वांनीच ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Minister Deepak Kesarkar responded to Shiv Sena party split claim made by BJP leader Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.