केंद्राच्या नोटबंदी धोरणात मोठी चूक, धोरण कुठे चुकलं हे केंद्रानं स्पष्ट करावं : वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 01:46 PM2022-05-31T13:46:17+5:302022-05-31T13:46:24+5:30

“हनुमानाचा जन्म हा वाद अनावश्यक आहे ;त्यापेक्षा महागाई, बेरोजगारीकडे लक्ष द्या,” वळसे पाटील यांचं वक्तव्य.

minister dilip walse patil targets bjp government over demonetisation lord hanuman birth place issue | केंद्राच्या नोटबंदी धोरणात मोठी चूक, धोरण कुठे चुकलं हे केंद्रानं स्पष्ट करावं : वळसे पाटील

केंद्राच्या नोटबंदी धोरणात मोठी चूक, धोरण कुठे चुकलं हे केंद्रानं स्पष्ट करावं : वळसे पाटील

Next

“केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणामध्ये मोठी चूक झाली असून हे कशामुळे घडले व धोरण कुठे फसले ही भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट करावी,” अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. आज राष्ट्रवादी जनता दरबार उपक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“नोटाबंदीचे धोरण भारतीय अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण करणारे आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा हा पराभव आहे. हे कशामुळे घडलं व पुढे नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने काय उपाययोजना केली हे केंद्र सरकारने संपूर्ण चौकशी करून जनतेला माहिती द्यावी,” अशी मागणीही दिलीप वळसे पाटील यांनी केली.

हा वाद अनावश्यक
“हनुमानाचा जन्म अंजनेरीला झाला की किश्कंदला झाला हा वाद अनावश्यक आहे याला फार महत्त्व देऊ नका,” अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनावले आहे. दरम्यान महागाई, बेरोजगारी, टंचाई यासारखे अनेक प्रश्न देशासमोर आहेत याकडे लक्ष द्या असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. आज सगळे ठरवून चालले आहे. जे विषय देशासमोर नाहीत ते विषय काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राम जन्म आणि हनुमान जन्म कुठे झाला. हा विषय आजचा नसल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. 

सुरक्षा पुरवली आहे
“महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना आलेल्या धमकीची माहिती गृहविभागाकडे आली आहे. याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना कडक शिक्षा केली जाईल. संबंधितांना पुरेशी सुरक्षा दिलेली आहे. वाटल्यास अजून सुरक्षेत वाढ केली जाईल,” अशी माहितीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Web Title: minister dilip walse patil targets bjp government over demonetisation lord hanuman birth place issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.