मंत्री गिरीश महाजन यांना ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:01 AM2018-02-26T03:01:50+5:302018-02-26T03:01:50+5:30
सार्वजनिक वाचनालयातर्फे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना रविवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या हस्ते रविवारी कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
नाशिक : सार्वजनिक वाचनालयातर्फे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना रविवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या हस्ते रविवारी कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सावानाच्या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्यास हा पुरस्कार मला प्रेरित करेल. जनसेवक म्हणून मी विधिमंडळात सर्वच घटकांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहे. यापुढेही प्रश्न सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेत राहील, अशी भावना महाजन यांनी व्यक्त केली.
देशातील आजची वैद्यकीय व्यवसायाची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, ९३ टक्के लोकांचा रुग्णालय, डॉक्टरांवर विश्वास राहिला नाही.
केवळ ७ टक्के लोकांचा वैद्यकीय व्यवस्थेवर विश्वास टिकून आहे, ही देशाच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे बंग म्हणाले. वैद्यकीय व्यवसायाची स्थिती बघता रोग निवारण्यापेक्षा गरिबीनिर्मितीसाठी पूरक ठरत आहे, असे त्यांनी सांगितले.