मंत्री गिरीश महाजनांनी अतिरिक्त Y+ सुरक्षा नाकारली; पोलीस महासंचालकांना पत्र

By यदू जोशी | Published: December 13, 2022 01:31 PM2022-12-13T13:31:40+5:302022-12-13T13:32:00+5:30

याबाबतचं पत्र मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाठवले आहे

Minister Girish Mahajan rejects additional Y+ security; Letter sent to the Director General of Police | मंत्री गिरीश महाजनांनी अतिरिक्त Y+ सुरक्षा नाकारली; पोलीस महासंचालकांना पत्र

मंत्री गिरीश महाजनांनी अतिरिक्त Y+ सुरक्षा नाकारली; पोलीस महासंचालकांना पत्र

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांना ०९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त अतिरिक्त वाय+ (Y+) सुरक्षा देण्यात आली होती. परंतु ही सुरक्षा आपल्याला नको असं म्हणत महाजनांनी सुरक्षा नाकारल्याचं पोलीस महासंचालकांना कळवलं आहे. 

याबाबतचं पत्र मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाठवले आहे. या पत्रात महाजन यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा नेहमी तत्पर असते. मात्र राज्यातील पोलिस यंत्रणेची उपलब्ध संख्या तसेच पोलिस कर्मचाऱ्यांवरिल वाढता कामाचा ताण याचबरोबर पोलिस विभागातील वाहनांची कमतरता या सर्व बाबींचा विचार करता मला पुरवण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात यावी असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत आपण या पत्राची दखल घेत संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावेत असे मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिस महासंचालक यांना पाठवलेल्या पत्रातून मागणी केली आहे. 

Web Title: Minister Girish Mahajan rejects additional Y+ security; Letter sent to the Director General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.