मंत्रिपदावरून रिपाइंत जुंपली

By admin | Published: December 5, 2014 03:58 AM2014-12-05T03:58:33+5:302014-12-05T03:58:33+5:30

भाजपाला साथ दिल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)च्या पारड्यात एक तरी कॅबिनेट मंत्रिपद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मंत्रिपद मिळण्याआधीच रिपाइंतील वरिष्ठ नेत्यांमध्ये जुंपली आहे.

The minister hints at the rapist | मंत्रिपदावरून रिपाइंत जुंपली

मंत्रिपदावरून रिपाइंत जुंपली

Next

मुंबई : भाजपाला साथ दिल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)च्या पारड्यात एक तरी कॅबिनेट मंत्रिपद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मंत्रिपद मिळण्याआधीच रिपाइंतील वरिष्ठ नेत्यांमध्ये जुंपली आहे.
सध्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी अविनाश महातेकर आणि भूपेश थुलकर यांच्या नावाची चर्चा असून रिपाइंचे उपाध्यक्ष तानसेन ननावरे यांनी मात्र या दोघांच्या नावाला कडाडून विरोध केला आहे. आज थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आठवले यांनी राज्यात मंत्रीपद स्वीकारावे, अशी मागणी ननावरे यांनी केली आहे. शिवसेनेच्या युतीनंतर घटक पक्षांच्या जाळ््यातही कॅबिनेट मंत्रिपदे पडण्याची चर्चा सुरू आहे. रिपाइंमध्ये मंत्रिपदावरून दोन गट पडल्याचे समोर येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The minister hints at the rapist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.