मंत्री, राज्यमंत्र्यांच्या पीए, पीएसची सरकारी खर्चाने होणार हवाई सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:32 AM2018-08-02T02:32:44+5:302018-08-02T02:32:55+5:30
विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते यांच्या शासकीय दौऱ्यात त्यांची पत्नी सोबत नसेल तर त्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी वा स्वीय सहायक यांच्यापैकी एकास सरकारी खर्चाने विमान प्रवास करता येणार आहे.
मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते यांच्या शासकीय दौऱ्यात त्यांची पत्नी सोबत नसेल तर त्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी वा स्वीय सहायक यांच्यापैकी एकास सरकारी
खर्चाने विमान प्रवास करता येणार आहे.
वित्त विभागाने बुधवारी तसा आदेश काढला. आतापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे शासकीय दौ-यावर असताना, त्यांच्या खासगी सचिवांना त्यांच्यासोबत सामान्य वर्गातून (एकॉनॉमी क्लास) हवाई प्रवास करण्याची अनुमती होती.
आता ही सवलत वरील सर्वांच्या पीए, पीएस, ओएसडींना लागू करण्यात आली आहे. हे पीए, पीएस, ओएसडी सरकारी अधिकारी/कर्मचारीच असावेत आणि त्यांची कार्यालयीन आस्थापनेवर सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेनेच नियुक्ती झालेली असावी, अशी अट असेल.
आतापर्यंत मंत्री, राज्यमंत्र्यांना शासकीय दौºयात पत्नीला शासकीय खर्चाने नेता येत होते. मात्र, पीए, पीएस, ओएसडींसाठी तशी तरतूद नव्हती. ती करताना विधान मंडळाचे पिठासीन अधिकारी, विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या पीए, पीएस, ओएसडींनाही हवाई प्रवासाची संधी सरकारी खर्चाने मिळाली
आहे. त्याचा अतिरिक्त बोजा
मात्र राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे.