...तर ५०० एकर जमीन तुला देईन; मंत्री संदीपान भुमरे अन् चंद्रकांत खैरेंमध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 07:36 PM2023-06-12T19:36:40+5:302023-06-12T19:38:42+5:30

बिनबुडाचे आरोप करायचे, समोरच्यांना बदनाम करायचा हा खैरेंचा धंदा आहे. याची टीम त्यांच्याकडे आहे असा पलटवार मंत्री भूमरे यांनी केला.

Minister Sandipan Bhumare criticized former MP Chandrakant Khaire | ...तर ५०० एकर जमीन तुला देईन; मंत्री संदीपान भुमरे अन् चंद्रकांत खैरेंमध्ये खडाजंगी

...तर ५०० एकर जमीन तुला देईन; मंत्री संदीपान भुमरे अन् चंद्रकांत खैरेंमध्ये खडाजंगी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर - विनाकारण शिंतोडे उडवण्याचे काम चंद्रकांत खैरेंनी करू नये. जिल्ह्याची वाट खैरेंनी लावली. एखादे काम दाखवा जे खैरेंनी केले आहे. माझ्याकडे ७०० एकर जमीन आहे बोलता, सिद्ध करून दाखवा त्यातील २०० एकर मला राहू द्या, ५०० एकर तुला घे, हा माझा शब्द आहे. सातबारा काढा, ५०० एकर जमीन तुझ्या नावावर करेन, काहीही आरोप करायचे? असं आव्हान मंत्री संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरेंना दिले. 

मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, माझी वडिलोपार्जित किती जमीन होती त्याचे सातबारा काढू, परंतु चंद्रकांत खैरे यांचा व्यवसाय काय होता. पण इतका पैसा, संपत्ती कुठून आली? ज्याने त्याने व्यवसाय करावा, इतरांबद्दल बोलू नये. खैरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पक्षाच्या कार्यक्रमात संजय राऊतांनी झापलं, गॅलरीत कोणी नव्हते. समोरच कोणी नाही तर गॅलरीत कोण राहतील. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते खैरेंना विचारत नाही. त्यांचा राग आमच्यावर कशाला काढता? खैरेंनी कुणाच्या संपत्तीचे काढू नये. आम्ही चोऱ्या केल्या नाहीत असं त्यांनी सांगितले. 

तसेच आजही माझे आणि माझ्या वडिलांचा सातबारा दाखवतो, राजकारणात यायच्या आधी आमच्याकडे बागायती जमीन होती आणि कोरडवाहू जमीन होती. माझ्याकडे शेकडो एकर जमीन आहे असं सातत्याने खैरे सांगतात. चंद्रकांत खैरेंचे संतुलन बिघडले आहे. खैरेंनी निवडून यावे. स्वत: निवडून ये मग दुसऱ्याला निवडून आणण्याची भाषा करावी. छत्रपती संभाजीनगरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवारच निवडून येणार आहे. खैरेंना काही काम नाही. त्यांना त्यांच्या पक्षातच कोणी विचारत नाही. त्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही असंही मंत्री भूमरे म्हणाले. 

चंद्रकांत खैरेंचा टक्केवारीचा धंदा
बिनबुडाचे आरोप करायचे, समोरच्यांना बदनाम करायचा हा खैरेंचा धंदा आहे. याची टीम त्यांच्याकडे आहे. आम्ही रस्ते दिले, पाणी दिले, ही विकासकामे केली हे सांगू शकत नाही. २० वर्ष चंद्रकांत खैरेंनी काय केले? खैरेंनी माझ्यावर अनेक आरोप केले, पण टक्केवारीचा धंदा खैरेंचा आहे. हा धंदा गेल्या ५ वर्षापासून बंद झालाय. त्यामुळे ही टक्केवारी त्यांना आठवतेय. कन्नडला काम न करता पैसे लाटले. कित्येक ठिकाणी कामे न करता निधी लाटला. त्यामुळेच खैरेंना पराभव सहन करावा लागला असा घणाघात मंत्री भूमरे यांनी खैरेंवर केला. 

'त्या' बातम्या निराधार
मंत्रिमंडळातील ५ जणांना डच्चू देणार या बातम्या विरोधकांनी पेरलेल्या आहेत. याबाबत कुठेही चर्चा नाही. मला आस्थापना नाही, अधिकारी नाही मग मी बदली कशी करणार? विनाकारण कुणाकडून ऐकायचे आणि बातम्या पेरायचे. आमची नाराजी नाही. रोजगार हमीचे नाव आम्ही नावारुपाला आणले. हे खाते शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे आहे. मंत्रिमंडळातून डच्चू देण्याच्या बातमीला काहीच अर्थ नाही. भाजपाचा निरोप कुणी ऐकला? माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत. ज्यावेळी विस्तार व्हायचा असतो तेव्हा बातम्या पेरल्या जातात असा दावा मंत्री भूमरे यांनी केला. 

Web Title: Minister Sandipan Bhumare criticized former MP Chandrakant Khaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.