CBSEचा भोंगळ कारभार, गृहराज्य मंत्री Satej Patil यांना केले ग्रामसेवक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 01:12 PM2021-10-19T13:12:39+5:302021-10-19T13:13:29+5:30
Satej Patil News: गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचा फोटो ग्रामसेवक म्हणून छापून आलाय. CBSE बोर्डाच्या इयत्ता तिसरीच्या social studies या पुस्तकात (पान क्रमांक.70) हा फोटो आहे. सहामाही परीक्षेनंतर नवा सेक्शन सुरु झालाय. मुलाचा अभ्यास घेताना ही गोष्ट लक्षात आली.
कोल्हापूर - गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचा फोटो ग्रामसेवक म्हणून छापून आलाय. CBSE बोर्डाच्या इयत्ता तिसरीच्या social studies या पुस्तकात (पान क्रमांक.70) हा फोटो आहे. सहामाही परीक्षेनंतर नवा सेक्शन सुरु झालाय. मुलाचा अभ्यास घेताना ही गोष्ट लक्षात आली. फोटो तीन ते चार वेळा नीट बघितला.. नंतर हा प्रकार समजला असे पत्रकार महानंदा भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. सतेज पाटील यांनी 2009 मध्ये ग्राम विकास राज्यमंत्री म्हणून काम केले आहे..आता ते गृह, परिवहन राज्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत..
ग्रामपंचायत हा टॉपिक समजवून सांगण्यासाठी या फोटोचा आधार घेतलाय. खरं तर राज्यकर्ते हे जनतेचे सेवकच असतात.. पण एखाद्या जबाबदार मंत्र्याचा फोटो असा छापणे कितपत योग्य आहे? हा त्या पदाचा अवमान नाही का..? Cbse बोर्डाला राज्यातील मंत्री बहुतेक माहिती नसावेत..ग्रामसेवक हे ही एक सन्मानाचेच पद आहे. किंबहुना नेत्यापेक्षा गावकरी मंडळी ग्रामसेवकाच्या रोज संपर्कात असतात... महाराष्ट्रातल्या एखाद्या ग्रामसेवकाचा, ग्रामसेविकेचा फोटो बोर्डाला पुस्तकात छापण्यासाठी न मिळावा हे दुर्दैव म्हणावं लागेल.
गृहराज्य मंत्री हे अनोळखी नेतृत्व तर नक्कीच नाहीये. या आधीही 2009 ते 2014 त्यांनी गृहराज्यमंत्री या पदावरून कारभार पाहिला आहे. पुस्तकात जे छापलं जातं .. हे निदान एकदा तरी नीट तपासून घ्यायला हवं. विषय शिकवणाऱ्या शिक्षकांच्या लक्षात येणं गरजेचं आहे .मुलांना काय कळतंय.. असं म्हणून जर छापलं जात असेल तर हे अयोग्यच आहे. अभ्यासक्रम विस्तृतपणे देताना छापलेले संदर्भ चुकीचे नसावेत याची दक्षता घ्यायला हवी. पक्ष, राजकारण यापेक्षा नेत्याच्या संविधानिक पदाचा सन्मान व्हायला हवा अशी अपेक्षा भोसले यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.