मंत्र्यांकडून होणार आरटीओची झाडाझडती
By Admin | Published: January 28, 2015 05:19 AM2015-01-28T05:19:24+5:302015-01-28T05:19:24+5:30
नवी दिल्लीतील उबर टॅक्सी चालकाकडून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर खासगी टॅक्सी कंपन्यांना सुरक्षेसंदर्भातील उपाय
मुंबई : नवी दिल्लीतील उबर टॅक्सी चालकाकडून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर खासगी टॅक्सी कंपन्यांना सुरक्षेसंदर्भातील उपाय करण्याच्या सूचना परिवहन विभागाकडून करण्यात आल्या होत्या. यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आल्यानंतर अशी कुठलीच मुदत नसल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. याची गंभीर दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतली आहे. खासगी टॅक्सीतील प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील माहीती अद्याप आपल्याला सादर झालेली नसून राज्यातील दौऱ्यावरुन आल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच याची माहीती घेतली जाईल, असे रावते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
२0१४ च्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात परिवहन विभाग आणि खासगी टॅक्सी कंपन्यांची एक बैठक झाली होती. यात ११ डिसेंबरपर्यंत टॅक्सीचालक आणि वाहन यांची माहीती तर ३१ डिसेंबरपर्यंत सुरक्षेसंदर्भातील उपाय आणि अन्य माहीती सादर करण्याची मुदत खासगी टॅक्सी कंपन्यांना देण्यात आली. तर सुरक्षा उपायांची १५ जानेवारीपासून अंमलबजावणी करण्यास टॅक्सी कंपन्यांना सांगण्यात आले. (प्रतिनिधी)