पोलिसावर हात उगारणे नडले, राज्य सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 06:05 PM2020-10-15T18:05:47+5:302020-10-15T18:16:17+5:30
Yashomati Thakur News : आठ वर्षांपूर्वीच्या एका खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना ही शिक्षा सुनावली आहे.
अमरावती - काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्या आणि महाविकास आघाडी सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. आठ वर्षांपूर्वीच्या एका खटल्याचा निकाल देताना न्यायालयानेयशोमती ठाकूर यांना ही शिक्षा सुनावली आहे.
आठ वर्षांपूर्वी २४ मार्च २०१२ रोजी आमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामकाजात अडथळा आणणे, याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मुंबई: महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा
— Lokmat (@MiLOKMAT) October 15, 2020
अमरावती जिल्हा न्यायालयाने यशोमती ठाकूर यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या प्रकरणामध्ये यशोमती ठाकूर यांचा कारचालक आमि त्यांच्यासोबत असलेले दोन कार्यकर्तेगी दोषी आढळले आहेत. त्याबरोबरच फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलीसही शिक्षेस पात्र ठरला आहे.