केंद्र आणि राज्यातही हवे आठवलेंना मंत्रिपद
By admin | Published: January 11, 2015 01:22 AM2015-01-11T01:22:01+5:302015-01-11T01:22:01+5:30
खासदार रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाला राज्यातही सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
मुंबई : केंद्रीय मंत्रिपद आपल्याला मिळाले पाहिजे, ही मागणी कायम ठेवताना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाला राज्यातही सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
रामदास आठवले म्हणाले, की राज्यात रिपाइंला सत्तेत सहभागी करून घेऊ, असे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मला राज्यात परत येण्यात रस नाही. त्याऐवजी आमच्या पक्षाच्या अन्य लोकांना संधी मिळावी. विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपासोबत राहिल्याने त्यांच्या १२२ जागा निवडून येऊ शकल्या. आम्ही शिवसेनेला साथ दिली असती तर त्यांच्या जागा वाढल्या असत्या. भाजपाने त्याबाबत जाणीव ठेवणे आवश्यक आहे, असे आठवले म्हणाले.
२००९ पर्यंतच्या झोपड्या नियमित कराव्यात, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम १४ एप्रिलपासून सुरू करावे, शेतकरी वर्गावर असणारे सावकरांचे सर्व कर्ज माफ करावे, अशा मागण्याही आठवले यांनी केल्या.
(प्रतिनिधी)