...तर मंत्र्यांना बायकाच बडवतील!

By Admin | Published: July 29, 2016 01:22 AM2016-07-29T01:22:29+5:302016-07-29T01:22:29+5:30

सत्ता येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी महागाई कमी झाली का, एवढं फक्त आपल्या बायकांना विचारा. तुम्हाला तुमच्या बायकाच लाटणं घेऊन बडवतात की नाही बघा, अशा शब्दात

... the ministers will be in the house! | ...तर मंत्र्यांना बायकाच बडवतील!

...तर मंत्र्यांना बायकाच बडवतील!

googlenewsNext

मुंबई : सत्ता येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी महागाई कमी झाली का, एवढं फक्त आपल्या बायकांना विचारा. तुम्हाला तुमच्या बायकाच लाटणं घेऊन बडवतात की नाही बघा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या.
महागाई, बेरोजगारी तसेच कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांच्या वतीने चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला सुरुवात करताना पवारांनी हा हल्लाबोल केला. निवडणुकीच्या काळात कोणकोणती आश्वासने तुम्ही दिली होती हे आठवा. सह्याद्रीवर बसून त्यांचा आढावा घ्या. पाळलेली आश्वासने दिसत नाहीत हे पाहून तुमची झोप उडेल त्या दिवशी राज्याच्या हिताचे निर्णय होऊ लागतील, असे पवार यांनी बजावले. अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा?’ असा सवाल करावासा वाटतो. नुसती जाहिरातबाजी सुरु आहे. मोठमोठे दावे केले जात आहेत. जाहिरातबाजीबाबत तर भाजपाचा हात कोणी पकडू शकत नाही, असे ते म्हणाले.
सभागृहात २८८ सदस्य आहेत. त्यांच्यापैकी किती जणांच्या मतदारसंघात किती कोटींची गुंतवणूक मेक इन महाराष्ट्रमध्ये आली? आहेत ते उद्योग बंद पडत आहेत. बेकारी कधी नव्हे एवढी वाढली आहे. बेकारीपायी तरुण दहशतवादाकडे वळत आहे, असे ते म्हणाले. गोवंश हत्या बंदीचा निर्णय घेऊन सरकारने अनेकांना बेरोजगार केल्याची टीकाही त्यांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे यावेळी काढले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: ... the ministers will be in the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.