अल्पवयीन मुले वळताहेत गुन्हेगारीकडे

By admin | Published: May 20, 2016 02:33 AM2016-05-20T02:33:04+5:302016-05-20T02:33:04+5:30

शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण काळजी करण्याइतपत आहे.

Minor children turn crime in crime | अल्पवयीन मुले वळताहेत गुन्हेगारीकडे

अल्पवयीन मुले वळताहेत गुन्हेगारीकडे

Next


तळवडे : शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण काळजी करण्याइतपत आहे. विशेषत: चोरी, लूटमारी, टोळीयुद्ध यांसारख्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याने पालकांच्या जिवाला घोर लागला आहे.
मंगळवारी सकाळच्या सातच्या सुमारास चिखली येथील वृंदावन सोसायटीतील मथुरा स्वीटसमोर वृत्तपत्रविक्रेते शिवानंद चौगुले हे सकाळच्या वेळेत दूध आणि पेपरची लाइन टाकतात. चौगुले यांना दुधाची पिशवी किती रुपयांना आहे, असे एका अल्पवयीन मुलाने विचारले. त्यांच्या हातात दहा रुपयांची नोट देत असतानाच हाताला झटका देत त्यांच्या हातातील जवळपास एक हजार रुपयांची रोकड हिसकावली. काही कळायच्या आतच तो मुलगा रस्त्याच्या पलीकडे अगोदरच दोन मित्रांसह उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून पसार झाला. याबाबत त्यांनी चिखली येथील सानेवस्ती पोलीस चौकीत तक्रार नोंदविली आहे. पळवलेली रक्कम किरकोळ आहे. सकाळच्या वेळेत घरोघर दूध पिशव्या पोहोच करणाऱ्या व्यावसायिकांच्या दूधपिशव्या गायब होत आहेत. कधी कधी दुधाचा संपूर्ण ट्रे गायब केला जातो. आता तर हातातील रक्कम हिसकावून पळण्यापर्यंत मजल गेली आहे. अशा प्रकारच्या आणखी बऱ्याच चोरीच्या घटना घडत आहेत. किरकोळ रक्कम असल्यामुळे कोणी सहसा तक्रार करत नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यांना वाचा फुटत नसल्याने चोरट्यांचा या परिसरात सुळसुळाट झाला आहे.
या प्रकारामुळे दूधपिशव्या पोहोच करणारे, तसेच इतर व्यावसायिक वैतागले आहेत. पोलिसांनी या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.(वार्ताहर)
>इझी मनी : मौजमजा करण्यासाठी चोऱ्या
‘इझी मनी’ मिळवायचा आणि त्या पैशाचा हवा तसा विनियोग करायचा,
अशी मानसिकता मुलांमध्ये वाढत आहे. मौजमजा करण्यासाठी घरून पैसे मिळू शकत नाहीत. यात घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असणाऱ्या मुलांकडूनही वाममार्गाचा वापर केला जात आहे. एकमेकांच्या साथीने गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या वाढत असल्याने पालकांच्या जिवाला मात्र घोर लागला आहे.

Web Title: Minor children turn crime in crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.