वृद्धाने नात्यातीलच अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
By admin | Published: January 16, 2017 09:28 PM2017-01-16T21:28:45+5:302017-01-16T21:29:38+5:30
डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मिलिंदनगर येथील रहिवासी एका ५७ वर्षीय वृद्धाने नात्यातच असलेल्या आणि मुकुंदवाडी येथील रहिवासी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविल्याची घटना
ऑनलाइन लोकमत
अकोला,दि. 16- डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मिलिंदनगर येथील रहिवासी एका ५७ वर्षीय वृद्धाने नात्यातच असलेल्या आणि मुकुंदवाडी येथील रहिवासी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविल्याची घटना सोमवारी सायंकाळी समोर आली. नात्याला काळिमा फासणारी ही घटना डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाल्यानंतर उजेडात आली. मात्र, सदर प्रकरणाला प्रेमाची किनार आहे का? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
मुकुंदवाडी येथील रहिवासी असलेली १६ वर्षीय मुलगी रविवारी सायंकाळपासून बेपत्ता असल्याचे तिच्या आई-वडिलांच्या निदर्शनास आले. त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांसह मित्रांकडे चौकशी केली असता, या अल्पवयीन मुलीला तिच्याच नात्यात असलेल्या आणि मिलिंदनगर येथील रहिवासी भीमराव धर्माजी खंडारे (५६) याने रविवारी फूस लावून पळविल्याचे समोर आले. मुलगी रविवारी रात्री घरी न आल्याने तिच्या आई-वडिलांनी शोध घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांना ही माहिती एका नातेवाईकाने दिली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. यामध्ये त्यांनी भीमराव खंडारे याने मुलीचे अपहरण तसेच तिला फूस लावून पळविल्याचे नमूद केले. यावरून डाबकी रोड पोलिसांनी खंडारे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ आणि ३६६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.