अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By admin | Published: January 23, 2016 02:28 AM2016-01-23T02:28:24+5:302016-01-23T02:28:24+5:30
चौदावर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
चिंचवड : चौदावर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
याबाबत परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १४ वर्षांची असून, ६ व १४ जानेवारी या दोन दिवशी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला.
कुमार ऊर्फ पप्पू कल्याण कांबळे (वय २२), सागर ऊर्फ दाद्या सिद्धू रांजणघे (वय १९) व त्यांचा एक अल्पवयीन मित्र, सर्व राहणार वाल्हेकरवाडी, चिंचवड हे पीडित मुलीला सहा जानेवारीला सकाळी ७ वाजता घराच्या समोरून जबरदस्तीने गाडीवर घेऊन गेले. थेरगावजवळील नदीघाटालगत असणाऱ्या एका पत्राशेडमध्ये तिच्यावर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला, तर सागर हा फोन आल्याने तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुन्हा १४ जानेवारीला आरोपींनी पिडित मुलीला मोटारीतून पुन्हा त्याच ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.
पप्पू हा आकुर्डीतील एका मंडप डेकोरेटरकडे साउंड सिस्टीम आॅपरेटर म्हणून काम करतो. सागर हा वाल्हेकरवाडी रोडवरील एका वॉशिंग सेंटरमध्ये कामाला आहे. त्यांचा अल्पवयीन मित्र हा या परिसरातच कामाला आहे. पीडित मुलीची व तिन्ही आरोपींची ओळख होती. घडलेला प्रकार भीतीमुळे तिने कोणाला सांगितला नाही. अखेर पीडित मुलीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. (वार्ताहर)