अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Published: November 5, 2016 01:07 AM2016-11-05T01:07:38+5:302016-11-05T01:07:38+5:30

खेड तालुक्यातील पोलीस पाटील असलेल्या आरोपीने एका अल्पवयीन पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा उघडकीस आला

Minor girl raped | अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Next


राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पोलीस पाटील असलेल्या आरोपीने एका अल्पवयीन पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. पीडित मुलीने त्याच्याविरोधात आज खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांजळे गावाचा पोलीस पाटील असलेला आरोपी गंगाराम नामदेव खंडे ( वय ४६, रा. वांजळे, ता.खेड) हा अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने १४ सप्टेबर रोजी दुपारी, इयत्ता पाचवी आणि सहावीत शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींना वांजळे येथील आपल्या राहत्या घरासमोर त्या खेळत असताना, चॉकलेट देतो असे सांगून घरात बोलावुन घेतले होते. त्यानंतर त्याने घराला आतुन कडी लावली आणि त्यांच्याशी अश्लील चाळे केले होते. त्यानंतर मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर पोलिसांनी भा.द.वि. कलम ३५४(अ) (१) नुसार आणि बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८, १०, १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्यात आरोपी २४ आॅक्टोबर सत्र न्यायालयात शरण गेला. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे.
या पीडित मुलीचे मूळ गाव भिवेगाव ( ता- खेड ) हे आहे. तिची आई राजगुरूनागरला कामानिमित्त राहते. तसेच ती मुलगीही काही दिवसांपासून राजगुरूनगरला वसतिगृहात राहत होती. सुट्टीत तिची आई आणि हि मुलगी भिवेगाव येथे राहण्यास आल्या. त्त्या मुलीने ती वांजळे येथे राहत असताना २०१४ सालापासून आरोपी गंगाराम खंडे हा तिला बेशद्ध करून दोन वर्षे वारंवार अत्याचार करीत होता. ही गोष्ट मुलीने सांगितले. आईने फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुलीने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फियार्दीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरिक्षक चेतन माने अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Minor girl raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.