फौजदाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By admin | Published: August 7, 2016 01:19 AM2016-08-07T01:19:49+5:302016-08-07T01:19:49+5:30

फौजदार प्रेमकुमार सुखदेव बनसोडे याने पिस्तुलचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला़ ही खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उस्मानाबाद शहरातील

Minor girl tortured | फौजदाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

फौजदाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next

उस्मानाबाद : फौजदार प्रेमकुमार सुखदेव बनसोडे याने पिस्तुलचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला़ ही खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उस्मानाबाद शहरातील शाहूनगर भागात घडली़ याप्रकरणी मध्यरात्री दोन वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे शहर आणि परिसरतील वातावरण संतप्त बनले आहे.
तीन वर्षे गडचिरोली येथे काम केल्यानंतर त्याची नुकतीच सांगली येथे बदली झाली होती़ बदलीनंतर सुट्टीसाठी तो उस्मानाबादमध्ये आला होता़ ही मुलगी शुक्रवारी सकाळी घराच्या छतावर बसली असताना बनसोडे हा तिथे गेला़ वह्या दाखविण्याचा बहाना करून तिला स्वत:च्या खोलीत नेले. पिस्तुलचा धाक दाखवित ‘गडचिरोलीला असताना असे अनेक मॅटर हाताळलेत, मला काही होणार नाही’ असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला़ पीडित मुलीचे वडील घरी आल्यानंतर तिने घडला प्रकार सांगितला़ पीडितेच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांना घटनेची माहिती दिली़ पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, हरिष खेडकर आदींनी आनंदनगर पोलीस ठाणे गाठले़ पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बनसोडे याच्याविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांनी तत्काळ प्रेमकुमारला अटक केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Minor girl tortured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.