अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By admin | Published: July 31, 2015 12:37 AM2015-07-31T00:37:30+5:302015-07-31T00:37:30+5:30
पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने टेमघर येथील माजी नगरसेवकाच्या ब्लॉकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
भिवंडी : पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने टेमघर येथील माजी नगरसेवकाच्या ब्लॉकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
शहरातील दिवाणशाह दर्गा येथील एकलाख हाफिजउल्ला अन्सारी याने बाबा सलीम अन्सारी हा जादूने पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून यासाठी इच्छुक साथीदारांकडे लांब केस असलेल्या व अंगावर डाग नसलेल्या मुलीचा त्याच्याशी निकाह करून द्यावा लागेल, असे सांगितले. पैशांचा पाऊस पाडल्यानंतर मुलीला ताबडतोब तलाक देणार, असे सांगून नागाव येथील १७ वर्षांच्या मुलीला निकाहासाठी प्रेरित केले. मुलीच्या वडिलांनीदेखील मौलाना सय्यद रेहान याच्यासह तीन-चार जणांना सोबत घेऊन सलीम याच्याशी निकाह लावून दिला. हा निकाह टेमघर येथील माजी नगरसेवक शंकर गुंडलाच्या ब्लॉकवर लावण्यात आला. सदर ब्लॉकच्या शेजारील बंद ब्लॉकमध्ये त्या मुलीस नेऊन जादूने पैशांचा पाऊस पाडतो, असे सलीमने सांगत तेथे अगरबत्ती लावून जादूटोणा करण्याच्या आविर्भावात हातवारे केले. काही वेळाने पैशांचा पाऊस पाडण्याची वेळ निघून गेल्याने हे काम उद्या करू, असे सांगत सलीमने ५ ते १४ जुलै २०१५ दरम्यान त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित मुलीने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एकलाख हाफिजउल्ला अन्सारी, सलीम अन्सारी, मानव अधिकार समिती सदस्य अरुण घाडगे, आनंद बल्ला यांना अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मौलाना सय्यद रेहान रजा यास ताब्यात
घेतले असून शंकर गुंडलाचा शोध सुरू आहे.