अल्पवयीन मुलींवर मध्य प्रदेश, महाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचार
By Admin | Published: July 6, 2014 01:16 AM2014-07-06T01:16:45+5:302014-07-06T01:16:45+5:30
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्ये आघाडीवर आहेत.
जयेश शिरसाट - मुंबई
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्ये आघाडीवर आहेत. त्यातही 10 वर्षार्पयत मुलींवर पुरोगामी महाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचार होतात, हे धक्कादायक वास्तव नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, हुंडय़ासाठी छळ, अपहरण अशा महिलांविरोधी एकूण गुन्हेगारीबाबत नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून महिलांसाठी मुंबई, महाराष्ट्रापेक्षा देशातील
अन्य प्रमुख राज्ये, शहरे अधिक धोकादायक
ठरल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षी देशात एकूण 3,09,546 गुन्हे घडले. त्यापैकी सर्वाधिक 11 टक्के गुन्हे (32,809) आंध्र प्रदेशमध्ये घडले. पाठोपाठ उत्तर प्रदेश 32546, पश्चिम बंगाल 29826, राजस्थान 27933, महाराष्ट्र 24895, मध्य प्रदेशात 22क्61 इतके गुन्हे घडले. मात्र प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागील गुन्ह्यांचा दर काढल्यास महाराष्ट्र 14व्या क्रमांकावर आहे.
शहरांमध्येही विजयवाडा, कोटा, ग्वाल्हेर, दिल्ली, जयपूर, जोधपूर ही शहरे सर्वात असुरक्षित आहेत. देशातील शहरांमध्ये महिलांविरोधी गुन्ह्यांचा दर (एक लाख महिलांच्या लोकसंख्येमागील गुन्हे) 70 इतका आहे.
देशात एक लाख महिला लोकसंख्येमागे सरासरी 52 गुन्हे घडतात. महाराष्ट्रात हा दर 45 इतका आहे. या आकडेवारीनुसार महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य दिल्ली आहे. दिल्लीत हा दर 146 आहे. त्यानंतर आसाम, त्रिपुरा ही ईशान्य भारतातील राज्ये येतात. त्याखालोखाल राजस्थान, आंध्र प्रदेश, हरयाणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि केरळ ही राज्ये येतात.