बलात्कार करून अल्पवयीन मुलीचा खून

By admin | Published: November 15, 2015 12:47 AM2015-11-15T00:47:36+5:302015-11-15T00:47:36+5:30

राजेवाडी (ता. पुरंदर) येथे एका १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा काठी व वस्ताऱ्याने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे.

Minor girl's murder by rape | बलात्कार करून अल्पवयीन मुलीचा खून

बलात्कार करून अल्पवयीन मुलीचा खून

Next

जेजुरी : राजेवाडी (ता. पुरंदर) येथे एका १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा काठी व वस्ताऱ्याने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी काही तासांतच आरोपीस अटक केली असून त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुदाम सूर्यवंशी (वय ५०, मूळ रा. खळोसा, ता. औसा, जि. लातूर, हल्ली रा. राजेवाडी, (पाटीलवस्ती), ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे़
शुक्रवारी (दि. १३) या घटनेत बळी पडलेली ही तरुणी मौजे राजेवाडी गावचे राजेवाडी रेल्वेस्थानकानजीकच्या पाटीलवाडी येथील त्यांच्याच शेतात आईबरोबर आली होती. आई शेतातील काम करीत होती. ही तरुणी अभ्यास करीत बसली होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आईने जेवण करायला जाऊ, असे सांगितले असता तिने मला भूक नाही, तू जेवण कर असे सांगितले. आई जेवण करून दुसऱ्या शेतात काम करायला गेली होती. सायंकाळी ५ वाजता बाजूच्या शेतातून आई ती बसली होती तेथे आली़ पण ती दिसली नाही. तिला सर्वत्र शोधले, मात्र ती न आढळल्याने कुटुंबीयांना तिचा शोध घेण्यास बोलावले. सर्वत्र शोध घेतला असता सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेताच्या बांधाखालील बाजूच्या तालीखाली तिचे कपडे आढळून आले. जवळच बाभळीच्या लाकडात तिचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या तरुणीच्या आईने पोलीसपाटलाच्या मदतीने जेजुरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. फिर्यादीत त्यांनी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुलीला बोलावण्यासाठी जाताना शेजारील शेतकरी धनंजय मारुती जगताप यांच्या शेतावर मजुरीचे काम करणारा सुदाम सूर्यवंशी मला पाहून पळून गेला होता, असा संशय व्यक्त केला होता. (वार्ताहर)
पोलीस शिपाई गणेश थापळे, श्वान दुर्गासह घटनास्थळी हजर झाले. श्वानाने मृत मुलीच्या देहापासून माग काढीत आरोपी सुदाम सूर्यवंशी याचे जवळच असलेले घर गाठून घरातील रक्ताने माखलेले कपडे काढून दिल्याने पोलिसांचे काम
सोपे झाले.
सुदाम सूर्यवंशी यास रात्री उशिरा अटक केली. जेजुरी पोलिसांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन पंचांसमक्ष पाहणी केली, ठसेतज्ज्ञ सहायक पोलीस निरीक्षक परवीन शेख, वैज्ञानिक सहायक आर. एस. लोखंडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याने वस्ताऱ्याचा धाक दाखवत व अनेक वार करीत तरुणीवर बलात्कार केला, तसेच कळकाच्या काठीने मारून निर्घृणपणे खून करून मृतदेह तालीखाली फरफटत ओढत नेऊन टाकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
काल घडलेल्या या अत्यंत विकृत व हृदयद्रावक घटनेचे पडसाद संपूर्ण राजेवाडी गावावर उमटले असून आज दिवसभरही संपूर्ण गावात तणावपूर्ण शांतता पसरलेली होती. संतप्त ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद
ठेवले होते.

Web Title: Minor girl's murder by rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.