अल्पवयीन मुलींचा देहविक्रीसाठी वापर !

By Admin | Published: May 25, 2016 12:52 AM2016-05-25T00:52:07+5:302016-05-25T00:52:07+5:30

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची परराज्यात चार ते पाच लाख रुपयांना विक्री करून जबरीने देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पंचवटी पोलिसांनी

Minor girls use for sex! | अल्पवयीन मुलींचा देहविक्रीसाठी वापर !

अल्पवयीन मुलींचा देहविक्रीसाठी वापर !

googlenewsNext

नाशिक : अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची परराज्यात चार ते पाच लाख रुपयांना विक्री करून जबरीने देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
आरोपींमध्ये मल्हारखाण येथील महिला एजंटसह राजस्थानच्या तिघांचा समावेश आहे. संशयितांनी नाशिकच्या पाच मुलींची बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, कर्नाटकमध्ये विक्री केल्याची माहिती उजेडात आली आहे.
पंचवटीतील पीडित मुलीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईशी शिर्डीतील सुनीता गौराणे हिने
पाच वर्षांपूर्वी ओळख वाढवून
तुमच्या मुलीसाठी स्थळ आहे.
तिचा विवाह करायचा का, असे
सांगून लुणकरण चोथमजी परमार
या एजंटसह घर गाठले. त्यानंतर मुलगा मुंबईला कामाला असल्याचे सांगत मुलीला रेल्वेने अहमदाबादला नेले.
तेथे राजस्थानला राहणाऱ्या नितीन जैन (संघवी) याला
दाखवून एका कार्यालयात विवाह लावून दिला. त्यानंतर संशयित गौराणे व परमार यांनी जैनकडून सुमारे पाच लाख रुपये घेतले.
जैन याने मुलीला मी राजस्थानला राहत असल्याचे सांगून तिला अहमदाबादहून राजस्थानला कोमाता गावात घेऊन गेला. तेथे नेल्यानंतर मी तुला पाच लाख रुपयांना विकत घेतल्याचे सांगून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यातून तिला दोन मुले झाली व नंतर जैन हा भिमाल गावात राहायला गेला. त्यानंतर काही दिवसांनी संशयित व त्याची आई पदमादेवी यांनी पीडित मुलीला मारहाण करून तिचा छळ केला. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिला एजंट सुनीता गौराणे, राजस्थान येथील छगनलाल जोधराज जैन, लुनकरण परमार व चालक कैलास सॅन यांना ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)

असे फुटले बिंग
पीडित मुलीने १५ दिवसांपूर्वी राजस्थानहून पलायन करीत थेट नाशिक गाठले. घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीने पंचवटी पोलिसांना त्याबाबत सांगितल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी तपासाची चक्रे फिरविली.

चेन्नई कनेक्शन
अल्पवयीन मुलींची देहविक्रीसाठी बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद तसेच सुरतला विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राजस्थानातील मुख्य सुत्रधार छगनलाल जोधराज जैन याचे कर्नाटकमध्येही कनेक्शन असून त्याच्यामार्फत नाशिकच्या आणखी काही अल्पवयीन मुलींची संशयितांनी विक्री केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे नाशिकमधीलच एका चार वर्षीय बालिकेची देखील शिर्डीला विक्री केल्याचीही चर्चा आहे.

Web Title: Minor girls use for sex!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.